गोदा व्हॅली शैक्षणिक संकुलामध्ये पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडत आषाढी एकादशी उत्साहात साजरी
गोदा व्हॅली शैक्षणिक संकुलामध्ये पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडत आषाढी एकादशी उत्साहात साजरी
गोदा व्हॅली शैक्षणिक संकुलामध्ये पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडत आषाढी एकादशी उत्साहात साजरी
कोपरगाव विजय कापसे दि १८ जुलै २०२४– महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि संतांचे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचे पांडुरंग. प्रत्येक वारकऱ्यांना ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची ओढ लागते आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना देखील आपल्या या संस्कृतीची जाण व्हावी आणि हरी आणि वारीची ओढ लागावी यासाठी गोदा व्हॅली मध्ये दरवर्षी आषाढी एकादशी साजरी केली जाते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या नवीन प्रवासाला सुरुवात करीत असताना प्रथम येणारा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी आणि यासाठी सर्व विद्यार्थी आतुरतेने तयारीला लागतात. इयत्ता नववी आणि दहावी मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी ओम साई एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार सौ. दिपाली कदम आणि मुख्याध्यापिका सौ. अनिता कडलक यांनी दीप प्रज्वलन करून पांडुरंगाचे आणि पालखीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
समर्थ शेळके आणि संध्या थोरात या विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणीचे रूप साकारले तर सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून डोक्यावर तुळस, हातामध्ये टाळ आणि भगवे झेंडे हवेत उंच डोलावत विठू-माऊली गाण्याच्या तालावर रिंगण धरून पालखी मिरवत आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत शालेय परिसर भक्तीमय करून पंढरीच्या वारीचे दर्शन घडविले. प्रत्येक इयत्ता मधील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक अभंग सादर केला. तर काही विद्यार्थ्यांनी विठू-माऊली नामाच्या गाण्यावर नृत्य आणि लेझीम सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी हरिपाठ तर काहींनी फुगडीचा ठेका धरत वातावरण विठ्ठलमय केले. श्रावणी बडदे आणि धनश्री सांगळे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन करून आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले तर मुख्याध्यापिका सौ. अनिता कडलक यांनी अनेक वर्षापासून चालत आलेल्या या सांस्कृतिक परंपरेचा आणि आधुनिक युगाचा मेळ कसा घालावा आणि या सांस्कृतिक परंपरा जतन करून आपल्या संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालून आपले जीवन कसे सुखमय करावे याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक यांनी या सोहळ्याचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता केली केली.