आपला जिल्हा
महसूल विभागाच्या काम बंद आंदोलनास कोपरगाव स्वस्त धान्य दुकानदारांचा पाठिंबा
सोमवार दि १५ जुलै पासून सुरू आहे कामबंद आंदोलन
कोपरगाव विजय कापसे दि १९ जुलै २०२४– गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाचे कर्मचारी देखील सहभागी झाले आहे.या कामबंद आंदोलनास ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे यांच्यासोबत संलग्नित असलेल्या अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदनगर कोपरगाव शाखेच्या वतीने कोपरगावच्या नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांना पत्र देत पाठिंबा दर्शवला असून तरी शासनाने लवकरात लवकर महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार कोपरगाव शाखेच्या वतीने केली आहे.