आमदार आशुतोष काळे

रस्त्यांबाबत तक्रारी खपवून घेणार नाही आ. आशुतोष काळेंचे सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंत्याला खडे बोल

रस्त्यांबाबत तक्रारी खपवून घेणार नाही आ. आशुतोष काळेंचे सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंत्याला खडे बोल

रस्त्यांबाबत तक्रारी खपवून घेणार नाही आ. आशुतोष काळेंचे सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंत्याला खडे बोल

कोपरगाव विजय कापसे दि १८ जुलै २०२४ –कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांसाठी निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे मात्र या निधीचा योग्य विनियोग करून रस्त्यांची दर्जेदार कामे करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. त्यामुळे रस्त्यांबाबत पुन्हा नागरिकांच्या तक्रारी आल्यास खपवून घेणार नाही असे खडे बोल आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांना सुनावले आहे.

जाहिरात

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्यमार्ग ६५ च्या झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची कार्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यासमवेत  पाहणी केली.यावेळी पाहणी दरम्यान रस्त्याची अल्पावधीतच झालेली दुरावस्था पाहून उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांना आ.आशुतोष काळे यांनी चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले आहे.

जाहिरात

मतदारसंघातील नागरिकांनी खराब रस्त्यांचा खूप त्रास सोसला आहे. नागरिकांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून मतदारसंघातील रस्त्यांसाठी साडे चार वर्षात ४६० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून रस्त्यांची दर्जेदार कामे होऊन नागरिकांना टिकावू व मजबूत रस्ते मिळणे अपेक्षित आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी मी निधी कमी पडू दिला नाही व भविष्यात देखील कमी पडू देणार नाही. मात्र रस्त्यांसाठी आलेल्या निधीतून रस्त्याची कामे दर्जेदार झाली नाही तर त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे याची अधिकाऱ्यांनी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढील काळात रस्त्यांच्या बाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास खपवून घेणार नाही. ज्या ठेकेदाराकडून रस्त्यांची निकृष्ट कामे होतील त्या ठेकेदारांना काळया यादीत टाका मात्र खराब रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांना दिला आहे. तसेच रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदारास देखील रस्त्याचे काम घेण्याचा आपल्याला आग्रह केला नव्हता.आपण रस्त्याचे काम घेतले आहे तर ते  काम दर्जेदार होणार नसेल तर यापुढे रस्त्यांची कामे घेवू नका अशा शब्दात ठेकेदाराची कानउघाडणी केली.

जाहिरात

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वर्षराज शिंदे, रविंद्र चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, गंगाधर औताडे, प्रविण शिंदे, शंकरराव चव्हाण, माजी संचालक आनंदराव चव्हाण, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, संचालक बापूसाहेब वक्ते, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक शंकरराव गुरसळ, राष्ट्रवादी सोशल मेडिया सेल जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र औताडे, तालुकाध्यक्ष महेंद्र वक्ते, किसनराव पाडेकर, गोकुळ गुरसळ, केशव जावळे, युवराज गांगवे, किरण पवार, नंदकिशोर औताडे, सिकंदर इनामदार, कल्याण गुरसळ, किरण वक्ते, विलास चव्हाण, शिवाजी होन, विनोद रोहमारे, प्रवीण होन, बर्डे सर, प्रशांत होन, विजय पवार, गोकुळ पाचोरे, मयुर रोहमारे, राजेंद्र पाचोरे, नरेंद्र रोहमारे, गोकुळ कांडेकर, नरहरी रोहमारे, बाळासाहेब औताडे, प्रभाकर जावळे, भाऊसाहेब सोनवणे, भरत पवार, चांगदेव शिंदे, अमोल पाडेकर, विलास जाधव, संजय रोहमारे, शंकरराव गुरसळ, किसन काटकर, किरण होन, संदीप पवार, सचिन होन, ठेकेदार जगताप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
राज्यमार्ग ६५ च्या झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची पाहणी करतांना आ.आशुतोष काळे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे