गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामी जनार्दन प्रतिष्ठान आयोजित भव्य पालखी सोहळा
गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामी जनार्दन प्रतिष्ठान आयोजित भव्य पालखी सोहळा
गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामी जनार्दन प्रतिष्ठान आयोजित भव्य पालखी सोहळा
कोपरगाव विजय कापसे दि १९ जुलै २०२४– रविवार दिनांक २१ जुलै रोजी भव्य गुरुपौर्णिमा उत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोष साजरा होत असून त्यानिमित्त सर्वांचे श्रद्धास्थान असलेले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी स्थान कोपरगाव बेट येथे देखील गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून त्यानिमित्त स्वामी जनार्दन प्रतिष्ठान आयोजित उद्या शनिवार दि २० जुलै रोजी सालाबादप्रमाणे भव्य पालखी सोहळा आयोजित केला आहे.
याप्रसंगी मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन कंपनीचे चेअरमन पराग संधान, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैयाबेग, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
हा भव्य पालखी सोहळा शनिवारी २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री दत्त मंदिर विघ्नेश्वर चौक कोपरगाव येथे साजरा होणार असून तरी सर्व कोपरगावकरांनी तसेच गुरुबंधू भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन स्वामी जनार्दन प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले असून या सोहळ्याचा मार्ग श्री दत्त मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, श्री स्वामी समर्थ मंदिर, मोहनीराजनगर (बेट) असा असणार असून या पालखी सोहळ्याची सांगता जगद्गुरू श्री संत जनार्दन स्वामी समाधीस्थान कोपरगाव बेट येथे होणार आहे.