डॉ आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मद्य विक्री बंद ठेवण्याची मागणी
डॉ आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मद्य विक्री बंद ठेवण्याची मागणी
डॉ आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मद्य विक्री बंद ठेवण्याची मागणी
कोपरगाव विजय कापसे दि २४ जुलै २०२४– तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच एक मराठी लोककवी, लेखक आणि समाज सुधारक डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट २०२४ रोजी असलेल्या १०४ व्या जयंती सोहळ्यानिमित्त मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी एस.सी विभागाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल जाधव व कोपरगाव शहराध्यक्ष संदीप निरभवणे यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत केली आहे.
भारतीय जनता पार्टी एस.सी विभागाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल जाधव व कोपरगाव शहराध्यक्ष संदीप निरभवणे यांनी कोपरगाव ग्रामीण व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सबंध देशभरात डॉ आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असते त्याच अनुषंगाने कोपरगावात देखील जयंती सोहळा आयोजित करण्यात आलेला असतो परंतु या दिवशी काही बोटावर मोजण्या इतके हुल्लडबाज मद्य पिऊन जयंती सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमात काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न जाणून बुजून करत असतात त्यामुळे वातावरण देखील खराब होते. असा काही प्रकार होऊ नये याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्वच प्रकारचे मद्य विक्री केंद्र १ ऑगस्ट रोजी बंद ठेवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टीचे एस.सी विभागाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष जाधव व कोपरगाव शहराध्यक्ष निरभवणे यांनी केली आहे.