नितीनराव औताडे

मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेले कामे जनतेपर्यंत पोहोचवा- शिवसेना पक्ष निरीक्षक राजु वाघमारे

मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेले कामे जनतेपर्यंत पोहोचवा- शिवसेना पक्ष निरीक्षक राजु वाघमारे

मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेले कामे जनतेपर्यंत पोहोचवा- शिवसेना पक्ष निरीक्षक राजु वाघमारे

जाहिरात

श्रीरामपूर प्रतिनिधी दि २७ जुलै २०२४शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी लोकाभिमुख कामे केली आहे. विकासाला गती दिली आहे. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वारकऱ्यांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, ज्येष्ठ नागरिकांसाठी
प्रवासात सूट, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी योजना अशा असंख्य योजना मुख्यमंत्र्यांच्या या सरकारने सुरू केलेल्या आहे. मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष काम करून जनतेपर्यंत या कामाचा लेखाजोखा सादर करावा. पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना विधानसभेत पाठवायचे आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा व निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन शिवसेना पक्ष निरीक्षक राजु वाघमारे यांनी केले.
ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देवळाली प्रवरा येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

जाहिरात

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. या योजनेतून महिलांना लाभ मिळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त फार्म भरून घेतले पाहिजे.शिर्डी लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवाला खचून न जाता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचे आपण काटेकोर पणे पालन करायचे आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने उभे रहायचे आहे असे त्यांनी सांगितले.

जाहिरात

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बूथ प्रमुख ,गटप्रमुख गण प्रमुख आदींच्या नेमणुका त्वरित करून घ्यायचा आहे अशा सूचना त्यांनी दिल्या.यावेळी माजी आ भाऊसाहेब कांबळे,शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे,प्रशांत लोखंडे , संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, शुभम वाघ युवा सेना जिल्हाप्रमुख ,दादासाहेब कोकणे उपजिल्हाप्रमुख शिवसेना प्रदीप वाघ- तालुकाप्रमुख श्रीरामपूर ,संदीप दातीर -तालुका प्रमुख युवा सेना श्रीरामपूर ,शिवनाथ फोपसे ,राहुल दातिर ,विशाल शिरसाठ सुरेश डी के , डॉक्टर जमदाडे , अरूण पाटील नाईक ,कुलदीप पवार ,शरद भणगे ,राहुल भंडारी ,मंगेश खरपस ,सतोष वायकर ,अशोक साळुंखे ,हरिभाऊ मुठे रोहित शिंदे अदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे