एस एस जी एम महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सीमा चव्हाण-दाभाडे यांना अर्थशास्त्र विषयात पेटंट
एस एस जी एम महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सीमा चव्हाण-दाभाडे यांना अर्थशास्त्र विषयात पेटंट
एस एस जी एम महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सीमा चव्हाण-दाभाडे यांना अर्थशास्त्र विषयात पेटंट
कोपरगाव विजय कापसे दि २९ जुलै २०२४-:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ.सीमा चव्हाण दाभाडे यांना “आर्थिक समावेशन आणि आर्थिक वाढीद्वारे विकासशील अर्थशास्त्रामध्ये बँकिंग सेवांचा अभ्यास” या संशोधन विषयावर पेटेंट मिळाले आहे. डॉ.सीमा चव्हाण- दाभाडे या रयत शिक्षण संस्थेत २०१३ पासून अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर, मंचर या महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले आहे. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांचे ४० संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे चार संदर्भग्रंथ प्रसिद्ध आहेत, दोन विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी चे संशोधन करत आहेत. डॉ. सीमा चव्हाण-दाभाडे यांनी ‘शासकीय उपाययोजनांचा अनुसूचित जमातीवर(पारधी समाज) झालेल्या आर्थिक व सामाजिक परिणामांचा अभ्यास’ या विषयावर आपले पीएच.डीचे संशोधन केले आहे.
महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. उज्ज्वला भोर यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले, त्याचप्रमाणे कला विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. बाबासाहेब शेंडगे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनीही हार्दिक अभिनंदन केले तसेच महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक , विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.