आपला जिल्हा

शहरातील प्रभाग दोन मधील नागरिकांनी दिले वीज समस्याविषयी निवेदन

शहरातील प्रभाग दोन मधील नागरिकांनी दिले वीज समस्याविषयी निवेदन
शहरातील प्रभाग दोन मधील नागरिकांनी दिले वीज समस्याविषयी निवेदन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ जुलै २०२४कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील महावितरण कंपनीच्या विजेच्या वेगवेगळ्या आणि अडचणी बाबत प्रभाग क्रमांक दोनचे कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक जनार्दन कदम यांच्या नेतृत्व स्थानिक रहिवाशांनी ५०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कोपरगाव शहर उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता धांडे यांना दिले आहे.

जाहिरात

सदर निवेदन देते प्रसंगी माजी नगरसेवक जनार्दन कदम, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब इनामके, सुमित भोंगळे, सिद्धार्थ पाटणकर, कृष्णा गवारे ओम उदावंत, दशरथ सरवण, संतोष बैरागी आदि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

जाहिरात

कोपरगाव शहरातील प्रभाग दोन मधील रहिवाशांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील निवारा,सुभद्रा नगर, रिद्धी सिद्धी नगर, जानकी विश्व कॉलनी व येवला रोड येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून दररोज लाईट जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळेच सदर परिसरासाठी नवीन विद्युत डीपी मिळावी व जुन्या असलेल्या डीपी ची क्षमता वाढवून द्यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी यापूर्वीच आपल्या कडे केली आहे परंतु त्यावर अद्यापही कोणतीच कारवाई आपल्या विभागाकडून झालेली नाही.

जाहिरात

 त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे  शैक्षणिक नुकसान होत आहे तर व्यापारी वर्गांला देखील मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आपण सदर परिसरात त्वरित नवीन डीपी द्यावी व सध्या चालू असलेल्या जुन्या डीपीची क्षमता वाढवून द्यावी अन्यथा लवकरच आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी विद्युत वितरण कंपनीला देत सदर निवेदनाची प्रत अहमदनगर जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी संगमनेर यांना पाठवली आहे.

निवेदन देतांना

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे