तुम्ही सुखरूप आहात ना? मतदार संघातील केदारनाथला अडकलेल्या भविकांशी आ.आशुतोष काळेंनी साधला सवांद
तुम्ही सुखरूप आहात ना? मतदार संघातील केदारनाथला अडकलेल्या भविकांशी आ.आशुतोष काळेंनी साधला सवांद
तुम्ही सुखरूप आहात ना? मतदार संघातील केदारनाथला अडकलेल्या भविकांशी आ.आशुतोष काळेंनी साधला सवांद
कोपरगाव विजय कापसे दि २ ऑगस्ट २०२४:- उत्तराखंड मध्ये खराब हवामानामुळे काही भाविकांचा मूत्यू झाला असून असंख्य भाविक अडकले आहेत. त्यामुळे आपल्या मतदार संघातून व केदारनाथ यात्रेला गेलेले व केदारनाथमध्ये अडकलेल्या भाविकांशी संवाद साधून तुम्ही सुखरूप आहात ना? या काळजीपोटी आ.आशुतोष काळे यांनी भ्रमणध्वनी वरून या भाविकांशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला आहे.
उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून या पावसाच्या तडाख्यात भूस्खलन होऊन अनेक पूल आणि रस्ते देखील वाहून गेले आहेत. बुधवार (दि.३१) रोजी रात्री उशिरा उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने परिस्थिती अजूनच बिघडली आहे. केदारनाथ परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात भाविक तेथे अडकले आहेत. त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या आपल्या मतदार संघातील भाविक सुखरूप असतील का?अशी चिंता आ.आशुतोष काळे यांना पडली होती.
ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील व्यक्ती अडचणीत असतांना कुटुंब प्रमुख त्याची विचारपूस करतो त्याप्रमाणे अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे मोबाईल नंबर मिळवत आपल्या व्यस्त कार्यक्रमातून मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी या सर्व भाविकांशी संवाद साधला. तेव्हा भाविकांनी केदारनाथ येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीची माहिती सांगितली. स्थानिक प्रशासन आम्हा सर्व भाविकांना सर्वोतोपरी सहकार्य करत असून आम्ही सर्वजण सुखरूप असून गुप्तकाशी जवळ नारायणकोट येथे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण आमची आस्थेवाईकपणे चौकशी केल्यामुळे आम्हाला निश्चितपणे पुढील प्रवासासाठी बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी भाविकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास संपर्क करा, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका, आहे तेथे सुरक्षित रहा, आणि सुखरूप माघारी परत या अशा काळजीवजा सूचना दिल्या..