रवंदेच्या विकासाला भरघोस निधी दिला-आ. आशुतोष काळे
रवंदेच्या विकासाला भरघोस निधी दिला-आ. आशुतोष काळे
रवंदेच्या विकासाला भरघोस निधी दिला-आ. आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि २ ऑगस्ट २०२४ :- कोपरगाव मतदार संघातील विकासासाठी आणलेल्या ३००० कोटी निधीतून प्रत्येक गावाला विकासाच्या वाटेवर आणून मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. यामध्ये रवंदे गाव देखील मागे राहिले नाही. रवंदे गावातील आजपर्यंत न सुटलेले विकासाचे प्रश्न सोडवून दाखविले असून रवंदेच्या विकासाला भरघोस निधी दिला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
आ.आशुतोष काळे यांनी रवंदे ग्रामस्थांच्या मागणीनुसार दिलेल्या निधीतून एमडीआर-४ गाडे वस्ती ते रवंदा रस्ता, रवंदे ते निमगाव रस्ता ह्या प्रमुख रस्त्यांसह अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यांची तसेच पाणीपुरवठा योजना, रवंदे-सोनारी रस्ता आदी विकासकामांची पाहणी करून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत व नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, मतदार संघातील अनेक रस्त्यांबरोबरच रवंदे गावातील नागरिकांना देखील रस्त्यांची मोठी अडचण होती. हि अडचण दूर करण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या व नागरिकांना अडचणीच्या असलेल्या सर्वच रस्त्यांना निधी देवून या रस्त्यांचा विकास साधला आहे.त्यामुळे निश्चितपणे रस्त्याबाबत असलेल्या नागरिकांची अडचणी दूर झाल्या आहेत. त्याप्रमाणे पाणी योजनेचे देखील काम प्रगतीपथावर असून लवकरच हि योजना देखील पूर्ण होणार आहे. यापुढील काळातही विकासाचे अनेक प्रश्न सोडविले जातील याबाबत नागरिकांनी निर्धास्त रहावे निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना दिली.याप्रसंगी रवंदे गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.