आपला जिल्हा

हर्षा पाटील इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित 

हर्षा पाटील इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित 

हर्षा पाटील इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ जानेवारी २०२६-  कोपरगाव येथील समृद्धी शहर स्तर या संस्थेच्या व्यवस्थापक हर्षा बाळकृष्ण पाटील यांनी गेल्या ८ ते १० वर्षांपासून कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील सर्व स्तरातील महिलांना एकत्र करत अनेक छोटे-मोठे बचत गट सुरू करत त्यांनी आपल्या समृद्धी स्तर या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय बँकांच्या माध्यमातून व योजने अंतर्गत बचत गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्तपुरवठा मिळवून दिला आहे. त्यातून अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहे याच त्यांच्या कार्याची दखल घेत नीती आयोग भारत सरकार मान्यता प्राप्त बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने मंगळवार दि ६ जानेवारी २०२५ रोजी शिर्डी येथे पत्रकार दिनी आयोजित आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभात इंटरनॅशनल अचीव्हर्स पुरस्काराने गौरविण्यात आल्याने ही नक्कीच कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

जाहिरात

 संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सन्मान सोहळ्यात श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोरक्ष गाडीळकर (आयएएस) जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, इंटरनॅशनल स्टार ब्युटी विजेती प्रिया चौधरी, महंत अवधूत महाराज आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

जाहिरात

हर्षा पाटील यांनी कोपरगाव शहरात ४०० हुन अधिकचे महिला बचतगट स्थापन करत यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या उद्देशाने वेगवेगळे घरगुती व्यवसाय सुरू करता येईल यासाठी प्रशिक्षण देखील दिले आहे तर या अगोदर सरपंच सेवा संघाने राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार देऊन तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोपरगाव यांच्या वतीने महिलादिनी विशेष सन्मान करण्यात आला असून त्यांचा इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे