डाॅ विखे पाटील फौडंशनच्या वतीने स्तनपान सप्ताहा निमित्त जनजागृती उपक्रम तर प्रश्नमंजूषा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
डाॅ विखे पाटील फौडंशनच्या वतीने स्तनपान सप्ताहा निमित्त जनजागृती उपक्रम तर प्रश्नमंजूषा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
डाॅ विखे पाटील फौडंशनच्या वतीने स्तनपान सप्ताहा निमित्त जनजागृती उपक्रम तर प्रश्नमंजूषा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर प्रतिनिधी दि ६ ऑगस्ट २०२४– डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहा निमित्त ‘अंतर कमी करणे: सर्वांसाठी स्तनपान समर्थन’या विषयावर आयोजित पथनाट्य आयोजित करून जनजागृती करण्यात आली.
वडगाव गुप्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यक्रमा मध्ये वडगाव गुप्ता गावचे सरपंच मा.विजयराव शेवाळे यांनी विशेष सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. तसेच कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यातील विविध कॉलेजमधील विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजेत्या कॉलेजला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमा मध्ये डॉ.निखील डोखे, श्रीमती. कविता भोकनळ यांनी प्रश्नमंजुषेचे मूल्यमापन केले. प्रश्नमंजुषे मध्ये डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थीनीं प्रथम क्रमांक तर श्रीमती. सिंधुताई एकनाथराव विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, लोणी येथील विद्यार्थीनीं दुसरा क्रमांक, सेवा नर्सिंग कॉलेज, श्रीरामपूर येथील मुलींनी तृतीय क्रमांक मिळवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.प्रतिभा चांदेकर, उपप्राचार्य डॉ.योगिता औताडे, श्री.अमोल अनाप, श्री.प्रशांत अंम्ब्रित यांनी विशेष परिश्रम घेतले.