तहसीलदार भोसले यांनी सामाजिक सलोखा ठेवून उल्लेखनीय काम केले : पद्मकांत कुदळे
तहसीलदार भोसले यांनी सामाजिक सलोखा ठेवून उल्लेखनीय काम केले : पद्मकांत कुदळे
तहसीलदार भोसले यांनी सामाजिक सलोखा ठेवून उल्लेखनीय काम केले : पद्मकांत कुदळे
कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑगस्ट २०२४ : शासकीय सेवेत कोणत्याही पदावर काम करत असताना त्या अधिकाऱ्याने धार्मिक सामाजिक व राजकीय सलोखा जोपासून काम केल्यासत्या अधिकाऱ्याची कामाची पावती जनतेकडून मिळत असते असे काम करणारे कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी उल्लेखनीय काम केल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी केले.
कोपरगाव तालूका शेतकरी कृती समितीच्या वतीने तहसीलदार संदीपकुमार भोसले यांची बदली झाली असून त्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोपरगाव शेतकरी कृती समितीचे नेते नितीन मनोहर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विकास आढाव, तुषार विद्वांस, बाळासाहेब पांढरे, सदाशिव रासकर,प्रविण शिंदे, संतोष गंगवाल पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब यावेळी उपस्थित होते.
यावेळी कुदळे बोलताना म्हणाले कोपरगाव तालुक्याला वर्षानुवर्ष अनेक प्रशासकीय अधिकारी यांनी काम केले आहे व शासनाच्या नियमानुसार बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी जावे लागते परंतु काही अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत ही निराळीच असून ती माणसे कामाच्या स्वरूपातून नागरिकांच्या मनामध्ये आपला ठसा उमटवितात तालुक्यामध्ये शासनाच्या विविध प्रकारच्या योजना राबवून महसुलच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना,रेशन कार्डचे अनेक समस्या शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्या अशा एक ना अनेक एक समस्या भोसले यांनी निपटारा करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना कोपरगाव तालुक्यात काम करण्याची संधी जरी कमी मिळाली असेल तरीही त्यांनी कमी कालखंडामध्ये अनेक प्रकारची कामे केली गोदावरी नदी असल्याकारणाने वाळू रोखण्याचे मोठे आव्हान त्यांनी स्वीकारले असून बहुतांशी वाळू तस्करी रोखण्यात त्यांना यश आले त्यांच्याच कालखंडामध्ये शासकीय वाळू डेपो तयार होऊन अनेकांचे घर बांधण्याचे अपुरे असणारे स्वप्नही पूर्ण झाले आहे घरकुलधारकांना वाळू मिळाल्याने त्यांचे घरकुल ही मोठ्या प्रमाणात झाले आहे असे अधिकारी तीन वर्षे त्या तालुक्यात असणे गरजेचे आहे जेणेकरून अनेक शासनाच्या योजनांचा लाभ हा नागरिकांना घेता आला पाहिजे असेही ते म्हणाले असून समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन कमीत कमी तीन वर्ष अशा अधिकाऱ्यांना त्या तालुक्यात काम करण्याची संधी मिळावी असे निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून भोसले हे काम करत असताना शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व असून अनेक मजूर,कामगार ,शेतकरी व महिला यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले असून ७५ हजार शेतकऱ्यांचा तालुक्यातील डाटा एकत्र करण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे असून ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी नवीन तहसीलदारांनी घ्यावी.
नितीन शिंदे
शेतकरी कृती समिती