सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ- आ.आशुतोष काळे
सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ– आ.आशुतोष काळे
उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे
कोपरगाव विजय कापसे दि १४ ऑगस्ट २०२४ – पाटबंधारे विभागाला सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत केलेल्या सूचनेवरून लाभधारक शेतकऱ्यांना २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये खरीप पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले असून खरीप हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १२ ऑगस्ट पर्यंत पाणी मागणी अर्ज भरणे लाभधारक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते. परंतु काही शेतकरी मात्र हि मुदत संपल्यामुळे आपले अर्ज मुदतीच्या आत दाखल करू शकले नाहीत.त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना केल्या होत्या.त्या सूचनेनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे अजूनही जे शेतकरी आपला पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले अशा शेतकऱ्यांनी आपले अर्ज सबंधित विभागाकडे तातडीने दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.