आत्मा मालिक हॉस्पिटलआपला जिल्हा

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे शिवजयंती साजरी

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे शिवजयंती साजरी

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे शिवजयंती साजरी

जाहिरात आत्मा

येवला विजय कापसे दि २० फेब्रुवारी २०२५विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा  कार्यक्रम साजरा करण्यात आला.

जाहिरात

याप्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे , राजेंद्र भावसार ,किरण साळवे उपस्थित होते.तसेच बाल शिवबा नमन गणेश गवळी  याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर शौर्य कंदलकर, अश्विन कुमकर या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा सुंदर पोवाडा सादर केला. याप्रसंगी शौर्य साळवे, श्लोक नाईक या विद्यार्थ्यांनी भाषणातून शिवरायांची महती सांगितली  तर स्पंदन लहरे यानी शिवगर्जना घेतली.तसेच काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट सांगितला तर काहींनी शिवाजी महाराजांचे पोवाडे तर काहींनी शिवाजी महाराजांचे गीत गायले.

जाहिरात

प्राचार्य तुषार कापसे यांनी शिवाजी महाराजांची कीर्ती किती महान होती हे सांगितले. त्यांनी कशा प्रकारे गनिमांना हरवले व गड किल्ले जिंकले याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.विद्यार्थ्यांकडून शिवाजी महाराजांचे घोषवाक्य म्हणून घेतले.प्रत्येक आईने जर जिजाऊ सारखे संस्कार आपल्या मुलांवर केले तर नक्कीच देश अजून सुधारेल असे म्हटले. उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

पोर्णिमा वाघ यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंती निमित्त माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रलेखा परदेशी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य,सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे