अमोल निर्मळ यांचे ऑलम्पिक विजेते चे फलक रेखाटण ठरत आहे आकर्षण
अमोल निर्मळ यांचे ऑलम्पिक विजेते चे फलक रेखाटण ठरत आहे आकर्षण
कोपरगाव विजय कापसे दि १४ ऑगस्ट २०२४– डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर कोपरगाव येथिल कलाशिक्षक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिनाच्या ७८ वा वर्धापन दिन समारंभानिमित्त ऑलम्पिक विजेते देश के सन्मान को कम मत होने देना तिरंगे को कभी ना झुकने देना हा संदेश देऊन भारतीय ऑलिंपिक विजेत्यांच्या कामगीरीचे आभिमान वाटणारे फलक चित्र रेखाटण केले आहे.
निर्मळ यांचे फलक रेखाटन हे सामाजिक धार्मिक व शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक अशा अनेक विषयांवर फलक रेखाटन करून देशसेवेचा संदेश दिलेला आहे . त्यात १५ ऑगस्ट निमित्त ऑलम्पिक विजेत मनू भाकर नीरज चोप्रा स्वप्निल कुसळे हरमनप्रीत सिंग यांच्या कामगीरीचे फलकावर रेखाटलेले चित्र हे आकर्षक ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाला सोशल मिडीयाच्या माध्यमातुन चांगला प्रतिसाद मिळाला असुन त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.