आपला जिल्हा
शिवबालक व शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा
शिवबालक व शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा
शिवबालक व शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १७ ऑगस्ट २०२४– भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शिवबालक व शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष शिवाजी लावरे तसेच उपस्थित पालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर भाषणातून आपले मत व्यक्त केले तर यश गडाख याने संदेश आते है.. हे गीत म्हणून उपस्थितांची मने जिंकली तसेच स्नेहल साबळे या विद्यार्थीनीने देशाला स्वतंत्र मिळाली पण देशात अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत याची खंत व्यक्त केली. श्रावणी निकम या केजी च्या विद्यार्थिनीने मेरे प्यारे वतन या गीतातून सर्वांची देशभावना जागृत केली सर्व उपस्थित विद्यार्थी यांनी टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थिनी कांचन तांबे हिने भारत देश व स्वातंत्र्य आणि माहिती तंत्रज्ञान व देशाची वैज्ञानिक प्रगती याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात केवळ अभ्यास करावा व आपले यश संपादन करावे असे सांगितले.
यावेळी प्रसंगी संस्थापक लावरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना परमपिता भगवान शिवाचे नाव शाळेला व महाविद्यालयाला दिले म्हणजे भगवान शिव आपल्या पाठीशी कायम आहे अनंत अडचणीवर मात करत असताना आपल्याला वेळोवेळी साक्षात्कार होतो. त्यामुळे आपल्या शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थ्याने वेगळेपण निर्माण करावे व नावलौकिक वाढवावे असा मोलाचा सल्ला दिला.विद्यार्थ्याने बदलत्या शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करून यश संपादन करावे असे सूचित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली वारकर व रंजना गोरखा यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रमोद देशमुख, बाबासाहेब पिंपळे, संदीप जाधव, टुपके रामेश्वर, अक्षय इंगळे व तसेच थोट हृषीकेश यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुवर्णा सोनवणे , पूनम भगुरे ,उर्मिला जाधव ,प्राची परजणे , शुभांगी गव्हाळे, कविता सोनार , शीतल कदम , वैशाली मगर , राणी सोनवणे तसेच परिवहन विभाग कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले शेवटी आभार रेणूका कोळपकर रेणुका हिने मानले.