येवल्याच्या आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी
येवल्याच्या आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी
येवल्याच्या आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी
येवला प्रतिनिधी दि २७ ऑगस्ट २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमंत शाह, संत सेवादास महाराज,संत चरणदास महाराज, प्राचार्य तुषार कापसे उपस्थित होते. गोपाल कृष्णाच्या पाळण्याचे व दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नर्सरी, एलकेजी युकेजी चे विद्यार्थी राधा व कृष्णाच्या वेशभूषेत आलेले होते. दुसरीच्या वर्गातील क्रिशा पहिलवान,आदिती भावसार,ऐश्वर्या आहेर या विद्यार्थिनींनी छान नृत्य सादर केले. इयत्ता 5वी तील श्रुती आघाव,तुषा प्रजापत, प्रीती जावळे, सृष्टी शिंदे, सृष्टी उगले ,समीक्षा जोरी कोमल शिंदे,जानवी मौर्या, ईश्वरी रासकर,आरोही पवार,आरोही करंजकर आरोही कायस्थ,आर्या जगदाळे,आदिती कोतवाल,अक्षरा कोकणे,अन्वी जेजुरकर, अपूर्वा पल्ले, दिव्या आदमाने, ज्ञानदा भावसार, दृष्टी पाटोळे ईश्वरी आसणे या विद्यार्थिनींनी मनमंदिर मे सजे बिहारी भजन सादर केले.
मनीषा कुमकर यांनी बाल कृष्णाच्या जीवनावर माहिती सांगितली. तुषार कापसे यांनीही श्रीकृष्ण जन्माची कथा सांगितली. विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या छान छान गोष्टीही सांगितल्या आणि गोपाल काल्याच्या व दहीहंडीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. हेमंत शाह, सेवदास महाराज, चरणदास महाराज यांनी विद्यार्थ्यांना गोपाल काल्याच्या शुभेच्छा दिल्या. नववी व दहावी च्या वर्गातील विद्यार्थी मनोरा रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आणि थोड्याच वेळात बालकृष्णाने दहीहंडी फोडली.संपूर्ण गुरुकुलात अवघा आनंदी आनंद झाला होता.जणू गोकुळच अवतरले आहे असे वाटत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.