गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या; आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना
गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या; आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना
गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या; आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना
कोपरगाव विजय कापसे दि २८ ऑगस्ट २०२४:- कोपरगाव मतदार संघात पावसाळा सुरू झाल्यापासून अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे अजूनही भूजल पातळी वाढलेली नाही. त्यामुळे ओव्हर फ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडून एस्केपद्वारे तलाव, गाव तळे, नदी नाले भरून द्यावेत अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी होत असून अद्यापही कोपरगाव संघात पुरेसा पाऊस झालेला नाही. याउलट नगर-नासिकच्या धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणे भरली असून होणाऱ्या विसर्गातून जायकवाडी धरण देखील ६५ टक्के भरले आहे. आजमितीला गोदावरी कालवे बंद असून जायकवाडी धरणात विसर्ग सुरूच आहे.
पुढील काळात जर पावसाने उघडीप दिली तर खरीप पिकांना त्याचा फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते. त्यासाठी गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होवून शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उपलब्ध होणार आहे. व अडचणीच्या काळात हेच पाणी खरीप पिकांना देवून शेतकऱ्यांना आपले खरीप पिक वाचविता येणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडून एस्केपद्वारे तलाव, गाव तळे, नदी नाले भरून द्या व या पाण्याचा खरीपाचा वापर समजून पाण्याच्या हिशोबातून वजा करू नका अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.