कोल्हे गट

कोपरगावमद्ये समस्या भरमसाठ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी फिरवली जनतेकडे पाठ 

कोपरगावमद्ये समस्या भरमसाठ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी फिरवली जनतेकडे पाठ 
कोपरगाव शहरातील वाढत्या समस्या,पालिकेला निवेदन देत आंदोलनाचा अल्टिमेटम 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑगस्ट २०२४कोपरगाव शहरातील करदात्या नागरीकांना सुविधा देण्यात पालिका कमी पडली आहे.वेळीच कामे न केल्याने पावसाळ्यात डासांचे साम्राज्य वाढून अनेक आजारांचे थैमान झाले आहे.जबाबदारी झुगारून ढिम्म लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी नागरीकांना वेठीस धरले आहे.डेंग्यू, चिकनगुनिया,पोटांचे विकार,गोचीड ताप यांसारखे आजार अस्वच्छता आणि दूषित पाण्याने वाढले आहे.यावर कार्यवाही करा म्हणून युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी वारंवार सूचना करूनही प्रशासन चाल पुढच्या ओढ्यात असे काम करत आहे.त्यामुळे प्रत्येक प्रभागात तातडीने औषध फवारणी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देणारे निवेदन भाजपा,शिवसेना उध्दव ठाकरे गट,आरपिआय यांच्या वतीने निवेदन कोपरगाव नगरपरिषदेस देण्यात आले आहे.

जाहिरात
पावसाळ्यात नाले सफाई व्यवस्थित होणे गरजेचे होते मात्र तुंबलेले नाल्यातील खराब कचरा कडेला टाकला गेला.त्यावर डास आणि दुर्गंधी झाल्याने नागरिक हैरान आहे. रस्त्यांचा दर्जा निकृष्ट आणि विकासकामांचा पालिकेच्या हक्काचा निधी टक्केवारी मद्ये लुप्त झाला पर्यायाने सगळे रस्ते चिखलमय झाले आहे.पाऊस उघडला की धुळीचा सामना करावा लागतो.साचलेल्या पाण्याने डासांची संख्या वाढली असून शहरात नागरिक अक्षरशः मेटाकुटीस आले आहे. समतानगर, लक्ष्मीनगर, १०५, संजयनगर, सुभाषनगर, खडकी, गोरोबानगर, गोदावरीनगर आदींसह विविध भागातील अनेक रुग्ण वाढले आहे.

जाहिरात
पिण्यासाठी येणारे गढूळ पाणी नित्याची बाब बनली आहे.तोंडाला पाने पुसली जावे तशी शहराला पाण्याची परीस्थिती आहे.खराब पाण्याने पोटाचे विकार वाढून रुग्णालयात विविध आजारांनी नागरिक रीघ लावून आहेत.जनतेच्या समस्या विचारात घेऊन कृती करता येणार नसेल तर शहरातील नागरीकांना तीव्र आंदोलन या कारभारा विरोधात करावे लागेल यासाठी हलगर्जी प्रशासन आणि डोळे झाक करणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील.प्रत्येक कामात भ्रष्ट्राचार करने हा प्रकार सुरू असल्याने जनता त्रस्त आहे.निदान आरोग्याच्या समस्या सोडवून त्या त्रासातून तरी वाचवा अशी भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात
यावेळी दत्तात्रय  काले, पराग संधान, संजयराव सातभाई, रविंद्र पाठक,विजय वाजे,अतुल काले, बबलू वाणी, जितेंद्र रणशुर, अशोक लकारे, प्रमोद नरोडे, दीपक जपे, नरेंद्र डंबीर, विवेक सोनवणे, गोपीनाथ गायकवाड, खालीक कुरेशी, सागर जाधव, पप्पूशेठ पडीयार, रंजन जाधव,विक्रांत सोनवणे, प्रकाश शेळके, रुपेश सिनगर,विनोद नाईकवाडे, सुशांत खैरे, फकीर महंमद पैलवान, अनिल जाधव, देविदास रोठे,सिद्धांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;

 नेहमीप्रमाणे मुख्याधिकारी दालनात हजर नव्हते त्यामुळे निवेदन घेऊन गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून निर्माण झालेल्या समस्या तातडीने सुटण्यासाठी उद्याच अंमलबजावणी करा अन्यथा सोमवारी आपले दालन पुन्हा गाठू अशी परखड भूमिका मांडली आहे.त्यावर तात्काळ कार्यवाही करतो असे उत्तर प्रशासनाने दिले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे