संजीवनी सैनिकी स्कूल तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम
संजीवनी सैनिकी स्कूल तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम
शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा क्षेत्रातही सैनिकी स्कूलची आघाडी
कोपरगांव विजय कापसे दि ३० ऑगस्ट २०२४: शालेय क्रीडा विभाग, अहमदनगर आयोजीत १७ वर्षांखालील मुलांच्या कोपरगांव तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी सैनिकी स्कूलच्या फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात आत्मा मालिक हायस्कूुल, कोकमठाण संघाविरूध्द २-० गोलने जिंकुन तालुक्यामध्ये अव्वल असल्याचे सिध्द केले, आता हा विजयी संघ प्रवरानगर येथेे दि ३ व ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी कोपरगाव तालुक्याचे प्रतिधित्व करेल, अशी माहिती संजीवनी स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की कोळपेवाडी येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेत एकुण सात संघांनी सहभाग नोंदविला. उपांत्य फेरीत संजीवनीच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलच्या संघाविरूध्द पॅनल्टी शुट आऊट मध्ये १-० गोलने सामना जिंकला. संजीवनीच्या संघात अविनाश लक्ष्मण कवडे, संकेत रमानाथ जाधव, हितेश दादाजी पाटील, समर्थ सुनिल राजुले, आयुश सोपान जगताप, विनित किशोर म्हस्के, हिमांशु दत्तात्रय काकलीज, अनुज रविंद्र गवते, गौरव भाऊसाहेब जाधव, शौर्य सुनिल भालेराव, संकेतकुमार नरेशकुमार गुप्ता, अनुराग नितिन बावचे, प्रथमेश नवनाथ हुल्लावाले, पार्थ प्रशांत तळेकर, अनुज संजय दातिर, कुणाल जिभाऊ पाटील, सुमेध अरूण पंड्या व प्रभु घनश्याम बैरागी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून संजीवनी सैनिकी स्कूलला अजिंक्यपद पटकावुन दिले.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व खेळाडू, प्राचार्य कैलास दरेकर व क्रीडा प्रशिक्षक रियाज शेख यांचे अभिनंदन करून खेळाडूंना जिल्हास्तरीय सपर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, फेसिंग, लाठीकाठी, स्वीमिंग, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल, अथेलेटिक्स, इत्यादी खेळांचेही प्रशिक्षण ण तज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येते.