राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जनार्दन होले यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जनार्दन होले यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार
कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑगस्ट २०२४– सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशी मद्य विभागाचे निरीक्षक म्हणून जनार्दन बी. होले रूजु झाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब व कारखान्यांचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे साहेब यांच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यांत आला.
कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकांत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी साखर उद्योगासह देशी मद्य निर्मातीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून कारखान्यांच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा करत तसेच महसूल व राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना अनेक नविन बदल घडविले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी व कारखान्याचे विद्यमान चेअरमन साहेब या नांवलौकीकांत आणखी भर घातली आहे.
श्री. जनार्दन बी. होले यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात ३४ वर्षे काम केले असुन शासनाच्या बळीकटीकरणानंतर त्यांनी कोल्हे कारखान्याच्या देशी मद्य विभागाचा निरीक्षक म्हणून मंगळवारी पदभार स्विकारला आहे. सत्कारास उत्तर देतांना ते म्हणांले, या पदाच्या माध्यमांतुन पारदर्शी कारभारातुन शासनाच्या महसुलांत वाढ करणे, बनावट देशी मद्यास प्रतिबंध करून सर्व प्रकारच्या कामात सहकार्य देवु अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक श्री. केदारी, आसवनी व्यवस्थापक आर जे. जंगले, मद्य विभागप्रमुख पवनकुमार पाटील, श्री. आव्हाड, श्री. सुराळकर आदि कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आसवनी व्यवस्थापक आर जे. जंगले यांनी आभार मानले.