कोपरगाव विजय कापसे दि १२ सप्टेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भारतीय सैन्य दलातून सुभेदार पदावरून सेवानिवृत्त शांतीलाल होन यांची शिवसेना सैनिक आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेशानुसार नुकतीच निवड करण्यात आली.
शिवसेना सैनिक आघाडीच्या सचिवपदी शांतीलाल होन यांची निवड झाल्याबद्दल कोळपेवाडी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, गौतम बँकेचे संचालक बापूसाहेब वक्ते, बापुराव वक्ते, शामराव वक्ते, पाटीलबा वक्ते, किसनराव सोळके, कल्याणराव गुरसळ सो मी अध्यक्ष महेंद्र वक्ते, भानुदास वक्ते ,संजय चव्हाण, किरण पाटीलबा वक्ते, सुनीलराव वक्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शांतीलाल होन यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की देश सेवेबरोबर समाजसेवा ही निष्ठेने करेल.सुत्रसंचालन कल्याणराव गुरसळ व आभार भानुदास वक्ते यांनी मानले.