आपला जिल्हा

स्वीप समितीच्या वतीने “सेल्फी भारतीयम् “जागतिक विश्वविक्रम उपक्रमाचे आयोजन

स्वीप समितीच्या वतीने “सेल्फी भारतीयम् “जागतिक विश्वविक्रम उपक्रमाचे आयोजन

मतदान कार्डासह सेल्फी फोटो पाठवण्यासाठी आवाहन; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नामांकन

अहमदनगर प्रतिनिधी दि ७ मे २०२४ (जिमाका) – अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने मतदान कार्डासह सर्वाधिक सेल्फी फोटो काढण्याच्या ‘सेल्फी भारतीयम्’ हा जागतिक विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह अन्य जागतिक सुमारे 15 जागतिक विश्वविक्रम प्रमाणित करणाऱ्या संस्थांकडे अहमदनगर जिल्हा स्वीप समितीने या उपक्रमाची नामांकने सादर केली आहेत.

जाहिरात

जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांनी आपले राष्ट्रीय मतदार ओळखपत्र (वोटर कार्ड) हातामध्ये धरून मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढायचा आहे. देशातल्या पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या ९००२१०९००३ या व्हाट्सअप क्रमांकावर १४ मे २०२४ पर्यंत स्वतःच्या संपूर्ण नावासह पाठवायचा आहे. सर्व सहभागी मतदारांना सहभागाचे प्रमाणपत्र व विशेष पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

जाहिरात

” जगातील सर्वात सक्षम लोकशाही असलेल्या भारताच्या ” चुनाव का पर्व देश का गर्व ” या निवडणुकांच्या महाउत्सवात राष्ट्र उभारणीला सशक्त करण्यासाठी प्रत्येकाने हिरीरीने सहभागी व्हावे व स्वतःला व समाजाला अभिमान वाटेल असे मतदान करावे. ” असे आवाहन डॉ.जावळे यांनी केले आहे.

जाहिरात

जास्तीत जास्त मतदारांनी ” सेल्फी भारतीयम” या उपक्रमात सहभागी होऊन शंभर टक्के मतदान देखील करावे. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, स्वीप नोडल अधिकारी अशोक कडूस, मीना शिवगुंडे, आकाश दरेकर, तहसीलदार (निवडणूक) प्रदीप पाटील, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, नायब तहसीलदार (निवडणूक) प्रशांत गोसावी , जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे