कोल्हे गट
कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे १४.५२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे १४.५२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे १४.५२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १७ सप्टेंबर २०२४– कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरन,डांबरीकरण व अंडर ग्राउंड ड्रेनेजचे १४.५२ कोटी रुपये कामांचे भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे,प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल,माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत व्हा.चेअरमन केशवराव भवर यांनी केले.
यावेळी प्रास्ताविक करताना विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव औद्योगिक वसाहत ही सुरवातीला जबाबदारी स्वीकारली तेव्हा उत्पनाच्या तुलनेत खर्च अधिक असा ताळेबंद होता.नंतर आवश्यक त्या पद्धतीने पावले उचलून स्व.शंकरराव कोल्हे साहेबांनी घालून दिलेला संस्था हिताच्या विचाराने घडी बसवली.आपल्याकडे सर्व प्रकारची समृद्धता आहे मात्र पाण्याचे नियोजन आणि तूट असल्याने व्यवसाय अवघड होत चालले आहे.तसेच युवकांना आज रोजगार हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा आहे.अनेकांना शिक्षण असून नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे विवंचना आहे.यासाठी मोठे काम उभे करावे लागणार आहे. वॉटर लेस इंडस्ट्री सारखे धोरण घेऊन रोजगार उपलब्ध करावा लागेल.नियोजनाच्या अभावाने शेतीचे एक रोटेशन कमी होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जाते आहे.जर शेती टिकली तर बाजारपेठ फुलेल या धोरणाला प्राधान्य देण्यात यावे. मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या माध्यमातून मोठी मदत वसाहतीला वीज प्रश्न आणि विविध विकास कामासाठी निधी मिळविण्यासाठी झाली.एम आय डी सी होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवत मोठा पाठपुरावा सर्वप्रथम केला त्यानंतर अनेक मंत्र्यांना भेटून प्रयत्न केले कारण युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला तर आपोआप प्रगती वाढेल.याशिवाय शेती आणि पिण्यासाठी भविष्यात अडचण येऊ नये यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवले तर मोठा प्रश्न मार्गी लागेल.माझ्यापेक्षा जे मान्यवर उपस्थित आहे त्यांचे विचार आपण ऐकणे महत्वाचे आहे.आलेल्या अतीथिंचा सन्मान आपण राखणे ही आपली संस्कृती आहे असे कोल्हे म्हणाले.
बिपीनदादा कोल्हे यांनी अभासपूर्ण मांडणी करत जागतिक पातळीवर विविध प्रदेश हे कसे अग्रस्थानी आले हे सांगितले.भविष्याचा वेध घेऊन आज पावले टाकली नाही तर व्यापार आणि उद्योजक हे संकटात येतील.कोपरगाव समृध्द होण्यासाठी काळानुसार नावीन्यपूर्ण बदल करणे गरजेचे आहे.अनेक स्थानिक उद्योजक हे परदेशात देखील आपले उत्पादन निर्यात करतात.औद्योगिक वसाहत विस्तार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.रोजगारासाठी संजीवनी नेहमी प्रयत्नशील असून कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे अर्थच्रक फिरते आहे त्यातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी मा.मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी जमिनी उपलब्ध करून ठेवल्या होत्या हे विसरून चालणार नाही.सद्या हजारो कोटींचे फलक दिसताय मात्र प्रत्यक्षात परीस्थिती बिकट असून कोणत्याही क्षेत्रात भरीव काम नाही.त्यामुळे जर उद्योग व्यवसायांना उभारी मिळण्यासाठी व पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी हजार कोटी उपलब्ध करून दिले तर कोपरगावचा कायापालट होईल त्यांनी ते करून द्यावे आम्ही स्वागत करू असे मत बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले.
ओमप्रकाश (काका ) कोयटे यांनी विवेकभैय्या कोल्हे यांच्यात माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे व्हिजन दिसते.त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे औद्योगिक वसाहत प्रगती पथावर नेली आहे.शक्य असल्यास आणखी एखादी उपशाखा सुरू करून समृध्दी महामार्गाचा लाभ आपण घेतला तर नक्कीच कोपरगाव अधिक प्रगती करू शकते.अनेकांना आदर्श वाटेल अशी यशस्वी औद्योगिक वसाहत होण्यासाठी विवेकभैय्या काम करता आहेत.त्यांच्या सारखे नेतृत्व गरजेचे आहे त्यातून युवा पिढीला अधिक बळ मिळेल.मला पारखण्याचे काम स्व.शंकरराव कोल्हे यांनी केले होते व आपल्या आत्मचरित्रात देखील त्यांनी माझा उल्लेख तालुक्याचे नाव मोठे करणारांच्या यादीत असेल असा केला होता अशी आठवण त्यांनी आवर्जून सांगितली.कोपरगावची भविष्यातली गरज लक्षात घेता औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचे काम हे स्व.शंकरराव कोल्हे यांनी केले.विवेकभैय्या देखील त्याच प्रकारे दूरदृष्टीचे काम करत आहेत त्यांचे व्हिजन अतिशय उत्तम आहे त्याचा फायदा तालुक्याच्या विकासाला नक्की होईल असे शेवटी काका कोयटे म्हणाले.
या वेळी मनोजशेठ अग्रवाल,रोहित वाघ, प्रशांत होन,सागर शहा,पंडित भारुड,संजय जगदाळे, पप्पूशेठ सारडा,अभिजित रहातेकर,डॉ.चंद्रशेखर आव्हाड, मुनिषशेठ ठोळे आदींसह सर्व संचालक,कारखानादार,उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी आभार रोहित वाघ यांनी मानले.