आपला जिल्हा

क्रांती युवक मंडळाची पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक संपन्न

क्रांती युवक मंडळाची पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक संपन्न

प्रेरणादायी युवा उद्योजगांचा सन्मान 

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि १८ सप्टेंबर २०२४सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील प्रसिद्ध क्रांती युवक  मंडळाने पारंपरिक पद्धतीने श्री गणेश विसर्जन मिरवणूक गणरायांना पालखीत विराजमान करून ढोल ताशा पथकाच्या गजरात बाप्पांना निरोप दिला.

जाहिरात

तसेच मंडळाने दरवर्षी प्रमाणे डीजे बँजो यासारख्या सर्व कर्णकर्कश वाद्यांना फाटा देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांचे ढोल ताशा पथकाच्या वादनातून गणरायांना पालखीत विराजमान करून पालखी रोड मार्गे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यंदाच्या वर्षी प्रथमच शिर्डीतील युवतींनी ढोल वाजत सहभाग नोंदविला. विसर्जन मिरवणुकीत घोडे उंट व आपली परंपरा जपणारे वासुदेव देखील टाळ मृदूंग वाजवत मिरवणुकीत सहभागी झाले.

जाहिरात

सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील प्रसिद्ध फेटेवाले श्रीकांत खंदारे यांनी मराठमोळा भगवा फेटा सर्वाना बांधण्यात आला. तसेच नित्यानंदगिरी महाराज, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते आदी मान्यवरांच्या हस्ते गणरायाची महाआरती व वाद्यपूजन होऊन विसर्जन मिरवणूक निघाली महिला भगिनींनी मोठया प्रमाणावर मिरवणुकीत पूर्णवेळ सहभाग नोंदविला. अतिशय उत्साहात मिरवणूक संपन्न झाली यंदाच्या वर्षी मंडळाने शिर्डीतील तरुणांना उद्योग व्यवसायाची प्रेरणा मिळावी यासाठी शिर्डीतील स्वकष्टावर नव व्यवसायाची उभारणी करून त्यात यश मिळविलेले प्रेरणादायी युवा उद्योजक विराट पुरोहित, विजय गोंदकर, संदीपभाऊ लुटे,हेमंत वाणी, राहुल रहाणे , शुभम गोंदकर, धनंजय जाधव, दत्तू वाळुंज, सोनू लोकचंदानी, शुभम ताम्हाणे, भावेश पटेल सचिन शेजवळ,विकी भोसले या सर्व प्रेरणादायी युवा उद्योजकांचा संन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले शिर्डीतील तरुण वेगवेगळ्या व्यवसायच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत याचा सार्थ अभिमान असून
सर्वच तरुणांनी या सर्व युवा उद्योजकांचा आदर्श घ्यावा असे आवाहन सर्व मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून केले. सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे