कोपरगाव विजय कापसे दि १७ सप्टेंबर २०२४–महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग व्यावसाय शिक्षण प्रशिक्षण संचालन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभरातील आयटीआय कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या संविधान मंदिराचे उद्घाटन रविवार दि सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते तसेच मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना अजित पवार, ना देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाले.
जाहिरात
त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये देखील रविवारी १५ सप्टेंबर रोजी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभहस्ते आयटीआय कॉलेजचे प्राचार्य सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संपन्न झाले.जाहिरात
या प्रसंगी कोपरगाव आयटीआय कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय भन्साळी, संविधान अभ्यासक नितीन पोळ, शिर्डी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य दुखाने सर, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक तथा लेखक पंडितराव भारुड, सामाजिक कार्यकर्ते निसार शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोपरगाव शहराध्यक्ष सतीश काकडे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांचे आभार व स्वागत प्राचार्य जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयटीआय कॉलेजचे बापुराव शिंदे, चक्रधर कळणे, प्रवीण माळी, अजय पाटील, सुरेश दिंडोर्डे, विजय घोगरे, वैशाली कुरापाटी, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब आव्हाड, कुंदन छजलानी, नितीन डोखे, राजेंद्र पानगव्हाणे, सुशील तरवडे, शुभम मासणे, प्रियांका पवार, मेजर मसाने व मेजर घोडेराव आदींनी अथक परिश्रम घेतले.