आपला जिल्हा

कर्मवीर शंकररावजी काळे विद्यालयात विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न

कर्मवीर शंकररावजी काळे विद्यालयात विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न
कर्मवीर शंकररावजी काळे विद्यालयात विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दिनांक ३ डिसेंबर २०२५: येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे शाळास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन नुकतेच उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध प्रयोग आणि गणितातील संकल्पनांवर आधारित प्रतिकृती सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

जाहिरात
प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक  दिनकर माळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  राधाकिसन टाकसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर बोलताना मुख्याध्यापक माळी सरांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी अशा प्रदर्शनांची गरज असल्याचे प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

जाहिरात
इयत्ता ५वी ते १०वी च्या जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांनी यात हिरिरीने सहभाग घेतला होता. या प्रदर्शनाचे परीक्षण व उत्कृष्ट प्रयोगांची निवड विद्यालयाच्या उपशिक्षिका  चौधरी मॅडम आणि उपशिक्षक गायकवाड सर यांनी केली. सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गणित विभाग प्रमुख चौधरी मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख  बरडे सर, मिनी गुरुकुल प्रमुख  पिंपळे सर, तसेच ठाकरे सर, टाकसाळ सर आणि  डांगे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे प्रदर्शन अत्यंत शिस्तबद्धरीत्या संपन्न झाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे