आपला जिल्हा

चिमुकल्यांनी मतदान करत निवडले शाळेचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री

चिमुकल्यांनी मतदान करत निवडले शाळेचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री

यशराज कापसे सर्वाधिक मत मिळवत झाला शाळेचा मुख्यमंत्री

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ जुलै २०२५- निवडणूक म्हटलं की, डोळ्यासमोर येते ते मोठमोठ्या सभा, जाहिराती, गल्लीबोळातील प्रचार फेऱ्या, भेटी गाठी जणू सर्वत्र यात्रेचा माहोल तयार झालेला असतो आणि असाच काहीसा प्रसंग करंजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवत प्रत्यक्ष मतदानातून शाळेचा उपमुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळ तयार केले.

जाहिरात
शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी जिल्हा परिषद शाळेत दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली इयत्ता १ ली ते ८ वीच्या वर्गातील अरविंद निकम, अभिषेक भिंगारे, यशराज कापसे, राजवीर आगवन, रुमान शेख, अनुज भिंगारे,हर्षदा ठाकरे, श्लोक भिंगारे, जयश्री शिंदे, इरफान पठाण या दहा विद्यार्थ्यांनी उमेदवारी करत शाळेतील मतदार असलेल्या २३९ विद्यार्थ्यांच्या भेटी घेत आपले चिन्ह व मत पत्रिकेवरील अनुक्रमांक सांगत कोणतेही आमिष न देता लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन केले आणि प्रत्यक्षात शनिवार दि २६ जुलै रोजी मोबाईल ॲप द्वारे कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटचा वापर करत निवडणूक प्रक्रिया निकोप व पारदर्शी पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांची मतदान कर्मचारी म्हणून नेमणूक करत संपन्न  होऊन इयत्ता तिसरीच्या वर्गातील यशराज एकनाथ शिंदे कापसे याने ५३ मतं मिळवत प्रथम क्रमांकाने निवडणूक जिंकत मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला तर दोन नंबरचे मत मिळवणारे इरफान पठाण व श्लोक भिंगारे यांना उपमुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले तसेच अनुज भिंगारे स्वच्छता मंत्री, अभिषेक भिंगारे अभ्यासमंत्री, हर्षदा ठाकरे क्रीडामंत्री, राजवीर आगवण सांस्कृतिक मंत्री, जयश्री शिंदे शिस्त मंत्री, अरविंद निकम परिपाठ मंत्री व रुमान शेख आरोग्यमंत्री यानुसार खातेवाटप करत मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले

जाहिरात
शाळेने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक आदींनी कौतुक करत मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळाचे अभिनंदन करत निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे देखील आभार व्यक्त केले.
राबविलेला उपक्रम हा अत्यंत प्रेरणादायी असून यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया कशी असते याचा बालवयातच अनुभव येतो त्यामुळे आपसूकच त्यांचा ज्ञानात भर पडत शाळेत येण्याची ओढ वाढते.
शबाना शेख
गटशिक्षणाधिकारी कोपरगाव

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे