विखे-पाटील

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात दिक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत नवागतांचे स्वागत

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात दिक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत नवागतांचे स्वागत

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात दिक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत नवागतांचे स्वागत

नगर प्रतिनिधी विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२४डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळदघाट, अहमदनगर येथे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रथम वर्ष बी.एस्सी (कृषी) मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘दिक्षारंभ 2024’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नव्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये स्नेहपूर्ण वातावरण निर्माण होऊन त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी जनरल तथा संचालक डॉ. पी. एम. गायकवाड होते. यावेळी संस्थेचे उपसंचालक (तांत्रिक) प्रा. सुनिल कल्हापुरे आणि प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांचीही उपस्थिती होती.

जाहिरात

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की, चालू शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी (कृषी) च्या ६ वी अधिष्ठाता समितीच्या निर्देशानुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याअंतर्गत दिक्षारंभ हा कार्यक्रम महाविद्यालयात राबवावा आणि त्यात प्रक्षेत्र भेटी, माजी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, सिनियर आणि नवीन विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद यावर भर द्यावा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषी अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रथम वर्षाला प्रमाणपत्र, द्वितीय वर्षाला पदविका, आणि चार वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच, त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्याची प्रशंसा केली.

जाहिरात

प्रा. सुनिल कल्हापुरे म्हणाले की, या संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याचे काम संस्था कटिबद्धतेने करत आहे. महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर तो परिपूर्ण विद्यार्थी म्हणून ओळखला जावा, या दृष्टीने शिक्षक मार्गदर्शन करत असतात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांनी दिक्षारंभ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून महाविद्यालयात शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपीका मावळे यांनी केले आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. एस. बी. राऊत यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. एच. एल. शिरसाठ यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे