जागतिक हृदय दिनानिमित्त कुंभारीत मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिर
डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान
कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील राघवेश्वर जागृत देवस्थान कुंभारी व श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर, नाशिक आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राघवेश्वर मंदिराचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी दिली.
हे शिबीर कुंभारी येथील राघवेश्वर जागृत देवस्थान येथे रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत चालू राहणार आहे.यावेळी नाशिक येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध तज्ञ हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी नशिक व मनोज चोपडा नाशिक यांचे व्याख्यान व मार्गदर्शन, तपासणी १० वाजता होणार आहे.या शिबिरासाठी डॉ. कुणाल निकम, डॉ.विजय साळुंके, डॉ. विजय गोडगे, डॉ. प्रथमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
या शिबिरात ब्लड प्रेशर . रक्तातील साखरेचे प्रमाण, गरज भासल्यास ई. सी. जी. स्त्रियांचे आजार तपासणी, हाडांचे आजार व तपासणी, मधुमेह निदान करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ८८०६६ ३५५६० व ९९२१२ २०२८० यांच्याशी संपर्क साधावा. आपली नाव नोंदणी ९०९६३ २४७९४ या नंबर वर करावा. असे आव्हान डॉ.विजय गोडगे यांनी केले.