आपला जिल्हा

गॅस टाकी भरताना ओटीपी आवश्यक- विशाल जगताप 

गॅस टाकी भरताना ओटीपी आवश्यक- विशाल जगताप 
गॅस टाकी भरताना ओटीपी आवश्यक- विशाल जगताप 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२४घरगुती स्वयंपाकी गॅस टाकी भरताना ग्राहकांना आता मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी नंबर देणे आवश्यक  झाले असून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव येथील मे.गुरुराज एचपी गॅस एजन्सीचे विशाल जगताप यांनी केले आहे.

जाहिरात
या विषयी विशाल जगताप यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच घरगुती गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर आपल्या रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरून बुक केल्यानंतर मिळत असायचा, परंतु चालू महिन्यापासून सर्वच एलपीजी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी घरगुती गॅस ग्राहकांनी ऑनलाइन गॅस टाकी बुक केल्यानंतर त्यांचा रजिस्टर मोबाईल नंबर वर त्या ग्राहकाची पुष्टी करण्यासाठी एक ओटीपी नंबर येणार असून तो ओटीपी नंबर तुमच्या घरी तुम्ही बुकिंग केलेले गॅस सिलेंडर पोहोचवण्यासाठी तुमचा एजन्सीचा डिलिव्हरी मॅन येईल तेव्हा त्याला तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून सिलेंडर बुक केल्यानंतर आलेला ओटीपी देणे बधनकारक केले आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी नंबर तुमचा एजन्सीच्या डिलिव्हरी मॅन ला गॅस सिलेंडर घेते वेळी सांगणे आवश्यक झाले असून त्याशिवाय आपल्याला गॅस सिलेंडर उपलब्ध होणार नाही तरी आपण सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

जाहिरात
आपल्या कडे येणाऱ्या गॅस डिलिव्हरी मॅन कडे असलेल्या मोबाईल ऍप द्वारे आपण मोबाईल नंबर रजिस्टर, ई-केवायसी व गॅस सेफ्टी तपासणी या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
विशाल जगताप
कोपरगाव तालुक्यातील मे.गुरुराज एच.पी गॅस एजन्सी कोपरगाव, एच.पी गॅस एजन्सी कोपरगाव व  गोपालकृष्ण गॅस एजन्सी संवत्सर यांच्या ग्राहक आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून  ९४ ९३ ६० २२ २२ या मोबाईल नंबर वर मिस कॉल देऊन गॅस सिलिंडर बुक करू शकता.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे