संगमनेर

सह्याद्री संस्थेच्या शाळांमध्ये व्यक्तिमत्व घडविणाऱ्या स्काऊट शिक्षणावर अधिक भर – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

सह्याद्री संस्थेच्या शाळांमध्ये व्यक्तिमत्व घडविणाऱ्या स्काऊट शिक्षणावर अधिक भर – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

वडगाव पान येथे ३५० स्काऊटस् – गाईडस् यांनी घेतला कार्यशाळेचा आनंद

संगमनेर प्रतिनिधी  विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२४- शाळेच्या चार भिंतींपलीकडे मिळणारे शिक्षण हे व्यक्तिमत्व घडवते जीवन कसे जगावे हे शिकवते आणि हे कार्य स्काऊट ही विद्यार्थी चळवळ खूप चांगल्या रीतीने करते म्हणून सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सर्वच शाळांमधून स्काऊट शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार आहे, ही घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे यांनी केली. वडगाव पान येथील डी के मोरे विद्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित एक दिवसाच्या स्काऊट – गाईड कार्यशाळेत ते बोलत होते.

जाहिरात

दुपारच्या सत्रात कार्यशाळेचा आढावा घेण्यासाठी आले असता सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचा आनंद त्यांनी घेतला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्ञानमाता शाळेत आपणही स्काऊट होतो असे सांगून डॉक्टर तांबे म्हणाले,  आपले स्काऊट  शिक्षक स्पगरे सर यांनी माजी विद्यार्थी व स्काऊट सेवाभावी संस्था स्थापन केली आहे माझे त्यावेळचे वर्गमित्र आणि शाळेचे माजी विद्यार्थी या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी सह्याद्री संस्थेच्या शाळांच्या मुलांना एकत्र करून असे कॅम्प आयोजित करण्यात येतील. काही कॅम्प शहरापासून दूर मोकळ्या किंवा नैसर्गिक वातावरणात घेतले जातील, ज्यामुळे निसर्गाचे अधिक ज्ञान विद्यार्थ्यांना होईल असेही डॉक्टर तांबे यावेळी म्हणाले. आपल्या स्काऊट जीवनातील काही किस्से, काही आठवणी त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितल्या.

जाहिरात

कार्यशाळेची सुरुवात स्काऊट ध्वजारोहणाने झाली यावेळी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांतील एका विद्यार्थ्याने ध्वजास मानवंदना देत ध्वजारोहण केले त्यानंतर माजी विद्यार्थी व स्काऊट सेवाभावी संस्थेचे सचिव आणि निवृत्त हवाई दल अधिकारी नारायण उगले यांनी मुलांच्या कवायती करून घेतल्या. त्यानंतरच सर्वांना अल्पोपाहार देण्यात आला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील सात शाळांतील पाचवी ते आठवी इयत्तांमधील सुमारे ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या होत्या. डी के मोरे जनता विद्यालय, अमृतेश्वर विद्यालय, श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय, भिमाजी अंबुजी शिंदे विद्यालय, शुक्लेश्वर विद्याल तसेच निळवंडे  आणि कानोली येथील भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय या शाळांचा त्यात समावेश होता.

जाहिरात

माजी विद्यार्थी व स्काऊटस सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने कार्यशाळेचे संयोजन करण्यात आले होते. मुख्य विश्वस्त व जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रत्नाकर पगारे, अध्यक्ष नारायण इटप, सचिव नारायण  उगले, सूत्रसंचालन उपाध्यक्ष दिगंबर बंदावणे, खजिनदार डॉ संजय गुंजाळ, समन्वयक शशिकांत गुंजाळ, सुधीर ब्रह्मे, रावसाहेब पारासुर हे यात सहभागी झाले होते. स्काऊट से आणि कार्यशाळेचे महत्व पगारे सर यांनी सांगितले. प्रास्ताविक श्री उगले यांनी तर  सूत्रसंचालन बंदावणे यांनी केले. अहमदनगर जिल्हा भारत स्काऊट-गाइड कार्यालयाचे  संजय शिंदे हेही यावेळी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून विविध प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. यात रोजच्या जीवनात वेगवेगळ्या वेळी उपयोगात येणाऱ्या गाठी कशा बांधायच्या हे दोरीच्या सहाय्याने शिकविण्यात आले. काठ्याना दोरी बांधून शिडीच्या सहाय्याने झाडावर सुरक्षित चढणे; त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीस चालणे शक्य नाही त्यास दोन किंवा तीन व्यक्तींनी हातावर धरून उचलून नेणे अंगातील शर्ट किंवा स्काऊट-गाईड गळ्यात बांधतात त्यास स्कार्फचा उपयोग करून स्ट्रेचर बनवणे आणि जखमी व्यक्तीला त्यावरून वाहून नेणे.  तसेच नदी ओलांडण्याकरता रशीचा पूल म्हणून उपयोग कसा करायचा व त्यावरून कसे या तीरावरून त्या तीरावर जायचे याचेही प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेण्यात आले.

जाहिरात

त्याचप्रमाणें गाण्यातून निसर्ग परिचय, घोषणातून निसर्ग रक्षणाचे महत्व, टाळ्यांनी पाहुण्यांचे स्वागत, सांकेतिक संदेश, गमतीदार मैदानी खेळ असे वेगवेगळे  कार्यक्रम कार्यशाळेत घेण्यात आले. स्काऊट गाईड जिल्हा प्रौढ संसाधनआयुक्त काशिनाथ बुचडे, ट्रेनर राजाराम टपळे, अशोक भोसले, संजय गडकर तसेच  जिल्हा गाईड प्रशिक्षण आयुक्त द्वारका वाळे, ट्रेनर सोनाली पठारे आणि मयुरी वायळ यांनी दिवसभराच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना खेळते ठेवले. नवनवे प्रकार शिकण्यास आणि करण्यास मुले-मुली उत्साहाने सहभागी झाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे