एचपीव्ही लस घेऊन युवतींनी आपले आरोग्य सुदृढ करावे-नगराध्यक्ष पराग संधान
एचपीव्ही लस घेऊन युवतींनी आपले आरोग्य सुदृढ करावे-नगराध्यक्ष पराग संधान
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२६–कोपरगाव नगरपालिका हद्दीमधील 14 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन एचपीव्ही लस घेऊन,आपले आरोग्य सुदृढ करावे, असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.
जाहिरात
कोपरगाव नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोपरगाव येथे सोमवारी 9 मार्च 2026 रोजी एचपीव्ही व्हॅक्सिन लसीचा शुभारंभ कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सांगत पालकांनी आपल्या मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.जाहिरात
ते पुढे म्हणाले,कोपरगाव शहर व परिसरामधील ज्या बालिकांचे वय 14 वर्षे पूर्ण झाले आहे आणि 15 वर्षे पूर्ण होण्याच्या आत आहे, त्यांनी एचपीव्ही व्हॅक्सिन लस घेणे अनिवार्य आहे. भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा दुसरा क्रमांक लागतो आणि त्याच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत वयाची 14 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न केलेल्या राज्यातील मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलींनी वेळेत लस घेणे गरजेचे असून यामुळे भविष्यात गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते. जास्तीत जास्त पालकांनी मुलींना या ठिकाणी लस घेण्यासाठी आणण्याचे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह डॉ.एपीजे अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने केले आहे.जाहिरात
याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,विद्याताई सोनवणे, अनिल आव्हाड, रवींद्र कथले, संतोष शिंदे, कैलास मंजुळ, स्वप्नील मंजूळ,फिरोज पठाण, डॉ. गायत्री कांडेकर, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. प्रियंका देशमुख, डॉ. आकाश तारगे आदींसह डॉ. एपीजे अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोपरगाव येथील सर्व कर्मचारी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले.