आपला जिल्हा

वारी-बाबतरा रस्त्याचा वनवास संपणार; दुरुस्तीसाठी ४ कोटी मंजूर-आमदार आशुतोष काळे

वारी-बाबतरा रस्त्याचा वनवास संपणार; दुरुस्तीसाठी ४ कोटी मंजूर-आमदार आशुतोष काळे

वारी-बाबतरा रस्त्याचा वनवास संपणार; दुरुस्तीसाठी ४ कोटी मंजूर-आमदार आशुतोष काळे

Kopargaon vijay kapse दि ४ ऑक्टोबर २०२६ :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या वारी-बाबतरा (प्रजिमा-२०३) या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी महायुती शासनाने ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोपरगाव मतदारसंघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून मतदार संघातील विविध रस्ते व पुलांची कामे पूर्ण झाली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत. तर काही कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

जाहिरात

वारी गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामासाठीही आमदार आशुतोष काळे यांनी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. अनेक वर्षांपासून वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी असलेल्या या पुलाचे काम पूर्ण होऊन काही महिन्यांपूर्वीच तो वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वारी परिसरातील दळणवळणाला मोठी चालना मिळाली आहे. दरम्यान, मतदार संघातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित रस्त्यांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यातूनच वारी-बाबतरा रस्ता (प्रजिमा-२०३) या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जाहिरात

या निधीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार असून, वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल वारी ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले. दरम्यान, नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे