आपला जिल्हा

डॉ. नानासाहेब गायकवाड यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्कार

डॉ. नानासाहेब गायकवाड यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्कार

डॉ. नानासाहेब गायकवाड यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्कार

Kopargaon vijay kapse दि ४ ऑक्टोबर २०२६-मढी खुर्द गावचे भूमिपुत्र, रयत शिक्षण संस्था, सातारा चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचरचे विद्यमान प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांना रयत शिक्षण संस्थेच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

जाहिरात

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कामगिरीबद्दल प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार कर्मवीर समाधी परिसर, सातारा येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगिरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, माजी खासदार तथा कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना डॉ. नानासाहेब गायकवाड यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता गायकवाड व चिरंजीव डॉ. हर्षल गायकवाड उपस्थित होते. त्यांच्या या गौरवाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे