आपला जिल्हा

सातभाई कौशल्य विकास संस्थेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

सातभाई कौशल्य विकास संस्थेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
सातभाई कौशल्य विकास संस्थेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ जुलै २०२५–  महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांच्या वतीने जुन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेत सुरू असलेल्या हमखास नोकरीची हमी देणाऱ्या एक वर्ष कालावधीच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रचा १०० टक्के निकाल लागला असून यात सुशांत परशराम साबळे (८५%) ओमकार संतोष वढणे (८३.२९%) साहिल अनिल चौधरी (८२.१४%) कुंदन जितेंद्र चौधरी (८१.४३%) पांडुरंग लक्ष्मण सदगीर (८०.४३%) प्रणव दिलीप चौधरी (७९.२९%) ऋषिकेश शिवाजी आरणे (७९%) ओम प्रदीप वढणे (७५.१४%) आफ्रिन कादिर पठाण (७५%)  रियान हरून मनियार (७४.२९%)  शाम कैलास डोके (७३.४३%) रोहित संतोष आळंदे (७१.८६%) रोहन बाळासाहेब ढवळे (६९.४३%) मार्क मिळवत सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

तर बांधकाम क्षेत्रातील कंस्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमाचा निकाल देखील १०० टक्के लागला असून यात शुभम अनिल कावळे (८७%) राहुल अशोक देवरे (८६.७१%) हरीओम वाल्मीक मडवई (८५.७१)  कृष्णा नवनाथ गायकवाड (८५.७१%) महेश वाल्मीक मढवई (८५.४३%)  चंद्रशेखर सुधाकर म्हस्के (८५%) सुहानी अर्जुन शिंदे (८४.१४%) मुजामिल अल्ताफ पटेल सय्यद (८४.१४%)  दीपक निवृत्ती घुमरे (८३.५७%) प्रणव सचिन कावळे (८३.१४%) गणेश वाल्मीक मढवई (८२.७%) दिपक रामदास मुंडे (८२.२९%) ऋषिकेश प्रमोद गायकवाड (८१.४३%) संकेत प्रभाकर शिंदे (८१.४३%) सिद्धार्थ प्रकाश शेळके (८१%) गौतम सिताराम डोळस (८०.८६%) अभिषेक कैलास संवत्सरकर (८०.५७%) अनय विलासराव आढाव (८०.२९%) यश अजय धुमाळ (७९.८६%) ओम राजेंद्र वडे (७९.२९%) विश्वजीत निशिकांत चिताळकर (७८.८६%) शुभांगी सुरेश सोनवणे (७८.४३%) निलेश जिजाभाऊ गवांदे (७८.४३%)  निलेश रविंद्र महाले (७८.१४%) अर्जुनसिंग सुरेंद्रसिंग शेखो (७६.१४%) नारायण गोरख शेळके (७५.१४%) नकुल त्रंबक पानसरे (६७.२९%) हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सतभाई, संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टर बापूसाहेब डांगे, प्रा विजय कापसे, प्रा विशाल धारणगावकर, जनार्दन सुपेकर, विजय जाधव, निलेश देवकर आदींसह आजी माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे