कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२४-वैद्यकीय कामानिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या कार्यालयात जाण्याचा प्रसंग आला.त्यावेळी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश झाल्याचे फोटो काढून वायरल करण्यात आले.प्रत्यक्षात मी कोल्हे कुटुंबाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.संपूर्ण कोपरगाव शहराला एसपी नावाने माझा परिचय आहे. जर वैद्यकीय कामानिमित्त एखादा माणूस कार्यालयात आला तर त्यानंतर त्याचा असा प्रवेश करून घेणे हे चुकीचे आहे.मी कोल्हे गटातच आहे असा खुलासा सलीम पठाण यांनी करत आमदार काळे यांनी करून घेतलेल्या खोट्या प्रवेशाचे भिंग फोडले आहे .
असे कोपरगाव मतदार संघात नागरिकांना समस्येच्या बदल्यात प्रवेशाची अट घालण्याचं दुर्दैवी काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहे.पाणी, वीज,रयत बदली,नोकरी, आरोग्य, रस्ते,ठेके,आर्थिक आमिष तसेच सामाजिक कामांच्या संदर्भात नागरिकांना येणाऱ्या अडचणीच्या प्रसंगात त्या नागरिकांना प्रवेशाची अट घालून त्यानंतर म्हणणे ऐकून घेतले जाते असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
अल्पसंख्याक समाजाला नेहमीच राजकीय भांडवल करून वापरण्याचे पाप आमदार काळे यांनी केले त्यातलाच एक भाग उघड झाल्यामुळे काळे गट पुरता तोंडघशी पडल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.संकटात मदत करण्याऐवजी त्याचे राजकीय भांडवल करण्यात माहीर असलेल्या आमदार काळे यांना सलीम पठाण यांनी जोरदार चपराक दिली आहे.अडचणीचा गैरफायदा घेऊन असे प्रकार करू नये व यातून काळे यांनी धडा घ्यावा असा सल्ला सलीम पठाण यांनी काळे यांना दिला.