काळे गट

गोळीबारातील आरोपी कोल्हेंचे निकटवर्तीय;  राष्ट्रवादी कडून कोल्हेंचा केला भांडाफोड

गोळीबारातील आरोपी कोल्हेंचे निकटवर्तीय;  राष्ट्रवादी कडून कोल्हेंचा केला भांडाफोड

गोळीबारातील आरोपी कोल्हेंचे निकटवर्तीय;  राष्ट्रवादीकडून गोळीबार प्रकरणातील आरोपीचे कोल्हे समवेतचे फोटो पत्रकारांना दाखवत कोल्हेंचा केला भांडाफोड

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२४ :- कोपरगाव शहरात मागील आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आ. अशुतोष काळे यांच्यावर आरोप करून एका आरोपीचा आ.आशुतोष काळे यांच्या समवेतचा फोटो दाखवत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र काळे परिवाराने आजपर्यंत कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला नाही आणी यापुढे देखील देणार नाही हे मतदार संघासह कोपरगाव शहरातील नागरिक जाणून आहेत. मात्र मतदार संघासह कोपरगाव शहारात झालेला विकास ज्यांना पाहवत नाही. त्यांनी खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी या घटनेतील आरोपींचे विवेक कोल्हेंशी किती निकटचे सबंध आहेत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवत विवेक कोल्हे यांचा भांडाफोड केला आहे.

जाहिरात नोकरी मेळावा

 कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात शनिवार (दि.२८) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, पाणी प्रश्न सुटावा यासाठी ५ नं.साठवण तलावाचे लवकरात लवकर जलपूजन व्हावे हि कोपरगावकरांची इच्छा होती. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी १५ सप्टेबर रोजी जलपूजन केले आणि आठच दिवसात नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देखील मिळू लागले. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. कोपरगाव शहराचा झालेला विकास व पिण्याच्या पाण्याचा सुटलेला प्रश्न त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आ.आशुतोष काळे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये कोपरगाव शहरांमध्ये अनेक विकास कामे करून बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली कामे आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली आहे. कोपरगाव शहरांमध्ये नागरीकांना तीन दिवसाआड पाणी मिळणार या भीतीने घाबरलेल्या विरोधकांनी आ.आशुतोश काळे यांच्यावर चुकीचे आरोप करून गुन्हेगारी लोकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या गोळीबारातील आरोपीचे विवेक कोल्हे यांच्या समवेत असलेले फोटो तसेच ज्याच्यावर गोळीबार झाला त्या दुसऱ्या आरोपीचे २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचार करतांना, जो आरोपी कोल्हेंचा कार्यकर्ता आहे त्या आरोपीचे कोल्हे सोबतचे फोटो पत्रकार परिषदेत सुनील गंगुले यांनी दाखविले. संबंधित नेत्याचा गोळीबारातील आरोपी सोबतचा फोटो पत्रकारांच्या माध्यमातून या कोपरगाव शहरातील जनतेला दाखवायचा आहे. ज्या आरोपीने अगोदर सांगितले की, आ. आशुतोष काळे यांचा याच्याशी काही सबंध नाही. तोच आरोपी दुसऱ्या दिवशी मात्र आ. आशुतोष काळे यांचे नाव घेतो मग त्याला पैसे देवून नाव घेण्यात आलं का? असा प्रश्न सुनील गंगुले यांनी यावेळी उपस्थित केला.

जाहिरात

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव म्हणाले की, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही खुलासे आणि काही गोष्टी कोपरगावच्या नागरिकाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. आ. आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता असणं आणि गुन्हेगार असणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. याचा नेत्याशी कुठलाही संबंध नसतो. गुन्हेगाराला कोणती जात नसते, धर्म नसतो किंवा गुन्हेगाराला कोणता पक्ष सुद्धा नसतो. मात्र रेशन व अवैध धंदे यांच्या बाबत करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. कोपरगाव तालुक्यात एकूण ११३ रेशन दुकानदार असून यामध्ये कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांचे १०० रेशन दुकान असून या रेशन दुकान संघटनेचा अध्यक्ष देखील कोल्हे यांचे कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ आहेत. रेशन दुकानला गोडाऊन मधून रेशन सप्लाय करणारा राजू होन नामक व्यक्ती कोल्हे यांचा कार्यकर्ता असून त्यांचे वडील संजीवनी कारखान्याचे कर्मचारी आहेत. त्यामुळे हा रेशन घोटाळा कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे असे आमचे ठाम मत आहे.आम्ही कोपरगावचे जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, निवडणुकीचा काळ आहे. विरोधक आरोप करणार आहे. परंतु मागच्या पाच वर्षांत २०१९ ते २०२४ पर्यंत आ.आशुतोष काळे यांनी ३००० कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघ व कोपरगाव शहरासाठी आणला आहे. अनेक विकास कामे जी मागील ४० वर्षात झाली नाही अशी कामे आ.आशुतोष काळे यांनी करून दाखविली आहे. त्यामुळे कुठेही बोलायला जागा राहिली नाही, ज्याची बरोबरी करू शकत नाही, त्याची बदनामी करायची याच उद्देशातून विरोधकांचे काम चालू आहे. आणि ज्याच्याशी त्यांचा काही संबंध अशा गोष्टीत त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम विरोधक करीत आहेत हि अतिशय निंदणीय गोष्ट आहे. यापुढे जर अशा पद्धतीने चुकीची बदनामी केली तर यापुढे यापेक्षा जोरदार प्रतिउत्तर देवू वेळप्रसंगी रत्यावर देखील उतरू असा ईशारा कृष्णा आढाव यांनी यावेळी दिला.या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

निवडणुकीच्या तोंडावर रोजगार मेळाव्याचे गाजर 

 कोपरगाव मतदार संघातील वाढलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी मतदार संघातील बेरोजगारांना मतदार संघातच रोजगार मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी एम.आय.डी.सी.मंजूर करून आणली आहे. त्यामुळे भविष्यात मतदार संघातील बेरोजगारी दूर होणार यात शंका नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोजगार मेळावा घेतला जात असून या रोजगार मेळाव्यातून किती बेरोजगारांना रोजगार मिळणार हा मोठा प्रश्न आहे. कारण २०१४ ला देखील त्यांनी असाच रोजगार मेळावा घेवून हजारो बेरोजगारांचे अर्ज भरून घेतले.  त्यावेळी किती जणांना रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा रोजगार मेळावा गाजर आहे.

चंद्रशेखर म्हस्के(जिल्हा अध्यक्ष सोशल मिडिया)  

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे