आपला जिल्हा

गौतम बँकेच्या संचालक पदी संजय आगवन यांची निवड 

गौतम बँकेच्या संचालक पदी संजय आगवन यांची निवड 

गौतम बँकेच्या संचालक पदी संजय आगवन यांची निवड 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२४माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी स्थापन केलेल्या तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्टपणे नावलौकिक असलेल्या कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील गौतम सहकारी बँकेच्या संचालक पदी नुकतीच करंजी येथील संजय कारभारी आगवन यांची निवड करण्यात आली आहे.

जाहिरात नोकरी मेळावा

संजय आगवन यांनी या आदि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविले आहे तर कोपरगाव तालुक्यातील करंजी गावचे उपसरपंचपद, रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था करंजीचे चेअरमन पद भूषवले आहे. तर ते सध्या करंजी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन असून त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार अशोकदादा काळे, आमदार आशुतोष काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवण, माजी जिल्हा परिषद सदस्या विमलताई आगवन, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे तालुका संघटक गोपाळ कुलकर्णी आदींसह संजुभाऊ आगवन मित्र मंडळ तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
संजय आगवन

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे