आपला जिल्हा
बिबट्या मुक्त तालुक्यासाठी सोमवारी जन आक्रोश आंदोलन

बिबट्या मुक्त तालुक्यासाठी सोमवारी जन आक्रोश आंदोलन

संगमनेर प्रतिनिधी दि १४ डिसेंबर २०२५- संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यामध्ये बिबट्यांची खूप मोठी संख्या झाली आहे. यामध्ये अनेक नरभक्षक बिबटे असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा याकरता सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. संगमनेर बस स्थानक ते प्रांत कार्यालय येथे भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.






