विखे-पाटील

ज्ञानेश्वर सृष्टीमुळे तिर्थस्थानाची ओळख विस्तीर्ण स्वरुपात जगासमोर येईल- ना.विखे पाटील

ज्ञानेश्वर सृष्टीमुळे तिर्थस्थानाची ओळख विस्तीर्ण स्वरुपात जगासमोर येईल- ना.विखे पाटील

अहील्यानगर येथे आराखड्याचे ववारकऱ्यांच्या समोर सादरीकरण

अहील्यानगर विजय कापसे दि ५ ऑक्टोबर २०२४ज्ञानेश्वर सृष्टीच्या अध्यात्मिक प्रकल्पातून नेवासा तिर्थस्थानाचे महत्व विस्तीर्ण स्वरुपात जगासमोर आणण्याचा विचार आहे.वारकरी सांप्रदायाच्या योगदानातून निर्माण होणारा अध्यात्मिक प्रकल्प जिल्ह्याची नवी ओळख ठरेल असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

सुमारे आठशे कोटी रुपयांच्या तयार करण्यात आलेल्या ज्ञानेश्वर सृष्टीच्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण सहकार सभागृहात मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातून आणि जिल्ह्यातील वारकार्यांच्या समोर करण्यात आले.रामायणाचार्य रामराव ढोक महाराज,महामंडलेश्वर लहवितकर महाराज ज्ञानेश्वर संस्थांनचे देविदास महाराज म्हस्के,महंत उध्दव महाराज मंडलीक पांडूरंग अंभग अरूणगिरीजी महाराज दिपक महाराज देशमुख जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपाचे अध्यक्ष दिलीप भालसिंग विठ्ठलराव लंघे अभय आगरकर बाबुशेठ टायरवाले विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेचा भावार्थ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगून जगासमोर आणले.मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषिकांना समजावा हा विचार त्यांनी केला.आज ज्ञानेश्वरीचा ग्रंथ २१ भाषामधून भाषांतरीत झाला आहे.जगाच्या पाठीवर असे एकमेव उदाहरण असलेल्या ग्रथांची निर्मिती आपल्या जिल्ह्यातील नेवासेच्या भूमीत व्हावी हा सर्वासाठी अभिमान आहे.

जाहिरात

ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जीवनाचे त्तत्वज्ञान आणि विचारांचे मूल्य विश्वाला संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथून दिल्याने या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्व विस्तीर्ण स्वरुपात जगासमोर आणण्याचा विचार ज्ञानेश्वर सृष्टीच्या उभारणी मागचा असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

या अध्यात्मिक प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला तरी यामध्ये वारकरी सांप्रदायाच्या सूचना आम्हाला अपेक्षित आहेत.केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करून यासाठी योगदान देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

जिल्ह्याला अहील्यानगर नाव देण्याचा निर्णय झाल्याचे मोठे समाधान व्यक्त करतानाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

जाहिरात

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि उज्जैन येथे निर्माण केलेल्या काॅरीडाॅरची संकल्पना नेवासा येथे निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

रामायणाचार्य ढोक महाराज यांनी वारकर्यांच्या मनात आहे त्याची पूर्ताताविखे पाटील यांनी करण्याचे ठरवले आहे.आपण सर्वजण आता गोपाळ आहोत कृष्णाच्या करंगळीची काठी ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प पूर्ण करेल आशा शब्दात त्यांनी प्रकल्पाच्या संकल्पनेचा गौरव केला.

महामंडलेश्वर लहवितकर महाराज यांनी विखे पाटील परीवाराने वारकरी सांप्रदायाशी जोडलेली नाळ चौथ्या पिढीपर्यत जोडलेली आहे.नेवासे येथील मंदीरासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्याकाळात केलेली वीस हजार हजार रुपयांच्या मदतीची आठवण त्यांनी आवर्जून सांगत आताही ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प त्याचीच अनुभूती असल्याचे त्यांनी याप्रसंगी पांडूरंग अंभग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.वास्तूरचनाकार अजय कुलकर्णी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

राज्यात गोसेवा आयोग स्थापन करून गोमातेला राज्यमातेचा घोषित केल्याबद्दल आणि अहील्यानगर नामतरांसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल मंत्री विखे यांचा वारकरी सांप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे