संजीवनी नोकरी महोत्सवात युवा शक्तीच्या चेहऱ्यावर झालेल्या आनंदाचे समाधान – विवेकभैय्या कोल्हे
विवेकभैय्या कोल्हे यांनी केले एका छताखाली हजारो नोकऱ्यांचे वितरण
कोपरगाव विजय कापसे दि ५ ऑक्टोबर २२०४-वाढती बेरोजगारी, सुशिक्षित युवा-युवतींचे निर्माण झालेले प्रश्न, नागरीकीकरण- औद्योगिकी करणांमुळे शेती सिंचन पाण्यात झालेली घट आणि माजीमंत्री स्व शंकररावजी कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन सुशिक्षीत बेरोजगारांचे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतून अहमदनगर जिल्हयातील पहिल्या संजीवनी नोकरी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांची रोजीरोटी सुरळीत चालावी हा विचार घेऊन हे कार्य सुरु केले ते आता थांबणार नाही असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील कोपरगांव बेट भागात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास कार्यस्थळावर शनिवारी संजीवनी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते मुलाखत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे होते.
माजीमंत्री स्व शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव परिसराला शैक्षणिक हब बनविले शेजारच्या शिर्डी साईबाबाचे अध्यात्मीक पर्यटन आणि येवला येथील टेक्स्टाईल उद्योग असा त्रिकोण साधण्याचा प्रयत्न करून येथील युवकांच्या हाताला काम देण्यांसाठी पुढाकार घेतला.
कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने शंभर हुन अधिक नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींना येथे बोलावून रोजगार मेळावा भरवून त्यांना नोकऱ्या देण्यासाठी पुढाकार घेतला यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे विशेष मार्गदर्शन लाभ लाभाले. कोपरगांव तालुक्यात १८ ते ३० वयोगटातील ६० हजार युवक युवती असुन त्यांच्यापुढे रोजगारासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यासाठी औद्योगिक वसाहत निर्मीतीसाठी प्रयत्न केले. या महोत्सवात ज्या युवक युवतीची नोकरीसाठी निवड झाली त्यांचे अभिनंदन व ज्यांची निवड झाली नाही त्यांच्यासाठी जॉब कार्ड देऊन विविध ठिकाणी असणाऱ्या नोकरींच्या संधीची माहिती एका लिंकद्वारे दर सोमवारी या सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, तेव्हा कुणीही निराश होऊ नये, हा उपक्रम आपण दरवर्षी भरविणार आहोत, युवकांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे कुटुंबियांच्या आर्थिक क्रयशक्तीत भर घालावी असेही ते म्हणाले.
संजीवनी नोकरी महोत्सवासाठी सुमारे दहा हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजेरी लावली, यात दिव्यांग बांधवांचाही समावेश होता., मुलाखतीत ज्यांची निवड झाली त्यांना यावेळी तात्काळ नियुक्ती पत्राचे वाटप होईल करण्यात आले. सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी, अल्पोपहार व्यवस्था, मुलाखत विभागणी यंत्रणा, संगणकाचा प्रभावी वापर, प्रशस्त जागा, आवश्यक मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था सगळं कसं नीटनेटकं होतं याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती