आपला जिल्हा

राष्ट्रीय थांग-ता’मार्शल आर्ट स्पर्धेत कोपरगावच्या श्रावणी गाडेला ब्राँझ मेडल

राष्ट्रीय थांग-ता’मार्शल आर्ट स्पर्धेत कोपरगावच्या श्रावणी गाडेला ब्राँझ मेडल
तालुक्यातील रवंदे येथील रहिवाशी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ ऑक्टोबर २०२४नुकत्याच ग्वाल्हेर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ‘थांग-ता’ मार्शल आर्ट स्पर्धेत कोपरगाव येथील श्रावणी गाडे हिला ब्राँझ मेडल मिळाले असुन तिच्या या यशाने नक्कीच कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात

‘थांग-ता’ हे मणिपूरचे ‘मार्शल आर्ट’ (युद्ध कला) आहे. मणिपुरी भाषेत  ‘ थांग ‘ म्हणजे तलवार आणि ‘ता ‘ म्हणजे भाला.  ही भारतीय पारंपरिक युद्ध कला आहे , जी क्रिडा प्रकारात देशभरात खेळली जाते.  वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय थांग-ता’स्पर्धेत यश संपादन करुन,मध्य प्रदेशातील ‘ग्वाल्हेर ‘येथे ३० व्या राष्ट्रीय ज्युनिअर थांग-ता चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे ४०० स्पर्धक येथे आले आहेत. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील, कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावची‘धाकड’कन्या श्रावणी संजयकुमार गाडे हिने महाराष्ट्र राज्याच्या संघातून ब्रॉंझ (कांस्य)पदक पटकावत घवघवीत यश संपादन करत  राज्याचा अभिमान वाढविला असुन श्रावणीच्या या यशस्वी कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.. श्रावणी हिला अहिल्यानगर जिल्ह्या थांग ता संघटनेचे सचिव प्रा. सुदर्शन पांढरे , ॲड. स्नेहल पांढरे, वर्षा देठे , सप्तमी डहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

तसेच श्रावणी ही महाराष्ट्र राज्य थांग ता संघटनेचे प्रमुख महावीर दुळधर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य संघाकडून खेळली. तर महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापक रूपाली जहागीरदार यांनी स्वतः राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान श्रावणी हिला प्रोत्साहित करून तिला ब्राँझ मेडल मिळविण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले.यशस्वी श्रावणीचे जिल्हा व राज्य थांग ता संघटनेने अभिनंदन करत भावी वाचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे