काळे गट

सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकच्या नृत्यकलाविष्काराने दांडिया स्पर्धकांचा उत्साह वाढविला

सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकच्या नृत्यकलाविष्काराने दांडिया स्पर्धकांचा उत्साह वाढविला

दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आ. आशुतोष काळे व  चैतालीताई काळे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑक्टोबर २०२४ :- नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि याच नवरात्र उत्सवानिमित्त आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया स्पर्धेला अनेक कलाकारांसह महिला भगिनींनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. या दांडिया स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती, नृत्य आणि सामुदायिक भावनेचा उत्सव कोपरगावकरांनी अनुभवला. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या दांडिया स्पर्धेला दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिच्या उपस्थितीने व तिच्या नृत्य कलाविष्काराने स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

जाहिरात

कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात भव्य दांडिया स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. यामध्ये लहान गटात एकूण ११ संघ व मोठ्या गटात एकूण २३ संघ अशा एकूण ४४ दांडिया पथकांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या स्पर्धकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून पारंपारिक नृत्याचे सौंदर्य दाखविणाऱ्या दांडिया खेळाच्या उत्कृष्टरीत्या केलेल्या सादरीकरणाने करून उपस्थित प्रेक्षकांचे मने जिंकत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात दांडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी लहान गट पहिले बक्षीस ३१,०००/- दुसरे २५,०००/-,तिसरे २०,०००/-, तसेच दांडिया स्पर्धा खुल्या गटासाठी पहिले बक्षीस ४१,०००/- दुसरे ३१,०००/-,तिसरे २१,०००/-, व प्रत्येक गटासाठी उत्तेजनार्थ तीन बक्षिसे रोख स्वरूपात ठेवण्यात आली होती.

जाहिरात

            या स्पर्धेतील विजेत्यांना आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले असून स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. लहान गट प्रथम बक्षीस आत्मा मालिक स्कूल,कोकमठाण, द्वितीय क्रमांक: न्याती समता उक्कलगाव, तृतीय क्रमांक : शारदा रॉकस्टार,कोपरगांव तसेच उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस दादा वामन जोशी श्रीरामपूर व गौतम पब्लिक स्कूल कोळपेवाडी, द्वितीय बक्षीस वाय.सी.डी. झेडपी शाळा, तृतीय बक्षीस जय अंबे ग्रूप कोपरगांव. खुला गट प्रथम बक्षीस शिवा ग्रुप मनमाड, द्वितीय बक्षीस सावरा ग्रुप अहील्यानगर, तृतीय बक्षीस इंडियन ग्रुप मनमाड, उत्तेजनार्थ प्रथम मोरया ग्रुप मनमाड, द्वितीय बक्षीस आकाश ग्रुप अहिल्यानगर, तृतीय बक्षीस आदिशक्ती, श्रीरामपूर यांनी पटकाविले.

दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करतांना आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळे.

कोपरगाव विकसित शहर——–

 रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी पुणे, मुंबई, नासिक अशा अनेक मोठ मोठ्या शहरात जावे लागते. अनेक वेळा शिर्डीला देखील साईबाबांच्या दर्शनाला आले. परंतु कोपरगाव शहरात प्रथमच येण्याचा योग आला आणि रसिकांचे मनोरंजन करण्याची संधी आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी महिला मंडळामुळे मिळाली. या शहरातील रसिक कलेचे उपासक असून  राज्यातील इतर शहरांप्रमाणे कोपरगाव शहर देखील विकसित शहर असल्याचे जाणवले.-मानसी नाईक (अभिनेत्री)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे