कोपरगाव मतदारसंघातील १५ कोटी रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण लवकरच होणार कामाला प्रारंभ -आ.आशुतोष काळे
कोपरगाव मतदारसंघातील १५ कोटी रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण लवकरच होणार कामाला प्रारंभ -आ.आशुतोष काळे
कोपरगाव मतदारसंघातील १५ कोटी रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण लवकरच होणार कामाला प्रारंभ -आ.आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑक्टोबर २०२४ :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून विविध रस्त्यांसाठी १५ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघाचा विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांनी चेहरा मोहरा बदलला असून विकसित शहर म्हणून कोपरगावची नवी ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघातील मुलभूत विकासाचे प्रश्न मार्गी लावतांना जे विकासाचे प्रश्न दशकानुदशकापासून प्रलंबित होते ते विकासाचे प्रश्न देखील आ.आशुतोष काळे यांनी सोडविले आहेत. तसेच उर्वरित विकास कामांना व रस्त्यांना निधी मिळावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदासंघातील विविध रस्त्यांसाठी १५ कोटी रुपयांच्या मंजूर करण्यात आलेल्या निधीतील रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून यामध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे.
रा.मा. ६५ मध्ये तालुका हद्द ते रांजणगाव पेट्रोल पंप तसेच झगडे फाटा ते पोहेगाव तालुका हद्द रस्ता सुधारणा करणे (१.२५ कोटी), रा.मा.७ ते धामोरी-रवंदे-ब्राह्मणगाव-येसगाव-धोत्रे-खोपडी रस्ता (प्रजिमा-४) मध्ये येसगाव ते ब्राम्हणगाव रस्ता सुधारणा करणे (७५ लक्ष), रा.मा. ७ ते धामोरी-ब्राह्मणगाव-येसगाव-पढेगाव-दहेगाव-बोलका-खोपडी रस्ता (प्रजिमा-४) मध्ये करंजी ते दहेगाव बोलका (नागपूर हायवे पर्यंत) रस्ता सुधारणा करणे (२.४० कोटी), वाकडी-रामपूरवाडी रस्ता (प्रजिमा-८७) मध्ये रामा ३६ पुणतांबा रोड जंक्शन रस्ता सुधारणा करणे (५० लक्ष), प्राजिमा ४ ते ब्राम्हणगाव-टाकळी-कोकमठाण-सडे-शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये नगर मनमाड हाय वे ते सडे-शिंगवे रस्ता सुधारणा करणे (८ .९० कोटी), रवंदे-पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे जिल्हा हदद रस्ता (प्रजिमा-५) मंडपी नाला (टाकळी जवळ) पुलाचे बांधकाम करणे (१.२० कोटी) या रस्त्यांच्या एकूण १५ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून व सातत्याने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्यातून हि मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेली कामे लवकरच सुरु होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.