आपला जिल्हा

विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना आवश्यक परवानग्यासाठी सुविधा कक्ष

विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना आवश्यक परवानग्यासाठी सुविधा कक्ष

विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना आवश्यक परवानग्यासाठी सुविधा कक्ष

अहिल्यानगर विजय कापसे दि १६ ऑक्टोबर २०२४विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.

प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा, तहसिल अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार आहे. परवानगीसाठी अर्ज व डी-१ नमून्यात अतिरिक्त माहिती, नगरपालिका/महानगरपालिकेचे जाहिरात लावण्याचे शुल्क व ना हरकत दाखला तसेच अनूसूची १६ आवश्यक आहे.

जाहिरात

सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठीच्या अर्जासोबत खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र व महानगरपालिका, नगरपालिकेची जागा असल्यास परवानगी शुल्क भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

खाजगी जागेतील जाहिरात फलकावर प्रचार साहित्य लावण्याची परवानगी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. यासाठी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा परवान शुल्क भरल्याचा पुरावा तसेच पोलीस ना हरकत दाखला जोडणे आवश्यक आहे.

जाहिरात

विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात (पांढरा रंग) प्रचार वाहनाची परवानगी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज, आर.सी. बुक, वाहनाचा इन्शुरन्स असल्याचा पुरावा, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची परवानगी, पोलीसांकडील नाहरकत दाखला, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, टॅक्स भरल्याची पावती, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना, पीयूसी तसेच वाहनाच्या चारही बाजूचा फोटो आवश्यक आहे.

उमेदवाराच्या तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. यासाठी करावयाच्या अर्जासोबत खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना शुल्क तसेच पोलीसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करतांना पोलीस अधीक्षक, महानगरपालिका/नगरपालिका/ ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच रुग्णवाहिकेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जाहिरात

सभेसाठी ध्वनिक्षेपकाची परवानगी पोलीस विभाग, तर वाहनासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावर पोलीस निरीक्षक परवानगी देतील. यासाठी अर्जासोबत वाहनांसाठीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

शाळेच्या मैदानावर सभा घेण्यासाठीची परवानगी उप विभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज, शाळा व्यवस्थापन, शिक्षणाधिकारी, स्थानिक प्राधिकरण, आणि पोलीसांच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती,बल्क
एसएमएससाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज व दोन प्रतीत जाहिरातीची संहिता तसेच निर्मिती (दोन प्रतीत पेन ड्राईव्ह किंवा सीडीमध्ये) जिल्हास्तरीय समितीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात सादर करावा, असे जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे