आपला जिल्हा

जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणाची चौकशी होणार; जाणीवपूर्वक त्रुटी आढळल्यास कारवाई – ना. राधाकृष्ण विखे-पाटील

जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणाची चौकशी होणार; जाणीवपूर्वक त्रुटी आढळल्यास कारवाई – ना. राधाकृष्ण विखे-पाटील

जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणाची चौकशी होणार; जाणीवपूर्वक त्रुटी आढळल्यास कारवाई – ना. राधाकृष्ण विखे-पाटील

जाहिरात

Shirdi vijay kapse दि ६ ऑगस्ट २०२६ – जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या घटनांची वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, जाणीवपूर्वक काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या घटनांबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना मंत्री विखे-पाटील म्हणाले की, जात पडताळणीचे काम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. तालुका स्तरावरील समितींना मुदतवाढ देण्यात आली असून, जिल्हा स्तरावरील घटनात्मक समितीकडून प्रमाणपत्रे नाकारण्यामागील कारणांची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे.

जाहिरात

एखादा अपवाद घडला असेल तर त्याची सखोल चौकशी केली जाईल. कोणाकडूनही जाणीवपूर्वक चुकीचे कृत्य झाले असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले की, निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली असून, मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेण्याचीही सरकारची तयारी आहे. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सातत्याने सकारात्मक निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

जाहिरात

मराठा समाजासाठी मनोज जरांगे-पाटील निस्वार्थीपणे काम करत असून, त्यांच्या आंदोलनाच्या काळात स्वतः त्यांनी संवाद साधल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकले, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षण रद्द झाल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
दोन-तीन जात प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या घटनांची निश्चित चौकशी होईल. मात्र, या घटनांचा इतर लाभार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीही मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे