आपला जिल्हा

आत्मा मालिक गुरुकुल येवला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

आत्मा मालिक गुरुकुल येवला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

आत्मा मालिक गुरुकुल येवला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

जाहिरात

येवला विजय कापसे दि  १९ फेब्रुवारी २०२६विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम येवला गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून येवला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे, कोरिओग्राफर राकेश राजपूत, कंकाली महाराज उपस्थित होते.

जाहिरात

शिवरायांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. इयत्ता पाचवीतील शिवानी बिलोरे या विद्यार्थिनी शिवरायांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर भाषण दिले. आले किती गेले किती उडून गेला भरारा, ना संपला ना संपणार कधी माझ्या शिवबांचा दरारा हे वाक्य बोलत तिने अतिशय दणकेदार भाषण सर्व विद्यार्थ्यांसमोर दिले. गुरुकुलाच्या शिक्षिका सोनाली घोडके यांनी देखील शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जीवन परिचय सांगितला.

जाहिरात

त्यात त्या म्हणाल्या की राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस l राजे तुम्ही होतात म्हणून दिसते अंगणात तुळस l राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुहासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ त्याचबरोबर शिवाजी महाराजांची अतिशय सखोल माहिती दिली. प्राचार्य तुषार कापसे यांनी देखील शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे