आत्मा मालिकला’ राज्यस्तरीय ‘कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय’ पुरस्कार
आत्मा मालिकला’ राज्यस्तरीय ‘कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय’ पुरस्कार
आत्मा मालिकला’ राज्यस्तरीय ‘कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय’ पुरस्कार
कोपरगांव विजय कापसे दि २१ ऑक्टोबर २०२४– सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षे़त्रात अग्रेसर असणाऱ्या जालना येथिल डॉ.पंजाबराव देषमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व आर. टी. एस. सी. फाऊंडेषन यांच्या वतीने राज्यस्तर ‘रॅषनॅलिस्ट टॅलेंट सर्च’ परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यालयास दिला जाणारा राज्यस्तरीय ‘कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय’ पुरस्कार ‘आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाला देऊन गौरविण्यात आले आहे.
आत्मा मालिक गुरुकुल सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, प्रज्ञाषोध परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्यात प्रथम स्थानावर असून आर. टी. एस. सी. परीक्षामध्ये गुरुकुलाचा रितेश संगीता आप्पसाहेब जाधव याने राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे.
या प्रसंगी डॉ. पंजाबराव देषमुख राष्ट्रीय शिक्षक परिषददेचे अध्यक्ष आर. आर. खडके पाटील, संस्थापक पप्पू पाटील भोयर, प्रदेषाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, आत्मा मालिक चे प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, स्पर्धा परीक्षा प्रमुख राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
आत्मा मालिक पॅटर्नचे हे यष असून त्या अंतर्गत अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, जादा तयारी वर्गाचे आयोजन, नैदानिक चाचण्या, सराव परीक्षा, विद्यार्थी व शिक्षकांची मेहनत यामुळे हे यश साकारले असे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, प्रकाश भट, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदींनी अभिनंदन केले.